Yuva Sena chief Aditya Thackeray while interacting with citizens during Shivsamwad Yatra on Tuesday. esakal
नाशिक

Aditya Thackeray | खोके सरकारकडून पोकळ अश्‍वासनं : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : अतिवृष्टीमुळे राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या खोके सरकारने पोकळ आश्‍वासनं देत ४ हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्यापर्यंत ही मदत पोहचली नाही.

हे सरकार केवळ कंत्राटदार, बिल्डर, व्यावसायिकांचे खिसे भरण्यात समाधान मानत असून जनभावनेचा सरकारकडून खेळ सुरु आहे, अशी टिका आमदार ठाकरे यांनी माळेगाव (ता. सिन्नर) येथील मेळाव्यात केली. (Aditya Thackeray statement opposing cm shinde government nashik news)

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, छोटू ताजनपुरे, सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे, शहरप्रमुख गौरव घरटे, शैलेश नाईक, पिराजी पवार, विलास सांगळे, संजय सानप, अरविंद सांगळे, गणेश आव्हाड, मंगेश सांगळे, आबासाहेब खैरनार, रामनाथ धनगर, किरण घुगे, कैलास आव्हाड, महेंद्र सांगळे, विनायक आव्हाड, शांताराम सांगळे, संजय आव्हाड व्यासपीठावर होते.

माझ्या मागे ‘महाशक्ती’ नाही, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे. त्यामुळे गद्दार माझ्या अंगावर येत आहेत. पण, जनता मला सांभाळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी त्यांनी व्यासपिठावरुन थेट जनतेत येत भाषण केले. येणाऱ्या सर्वच निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा तालुक्यात सर्वच निवडणूकांत भगवा फडकेल असा विश्‍वास श्री. दानवे यांनी व्यक्त केला. श्री. करंजकर यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. किरण कोथमिरे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

लवकरच सरकार कोसळणार

महाविकास आघाडी सरकारचा काळ हा सुवर्णकाळ होता. कोरोना काळातही राज्यात अनेक विकासकामे झाली. मात्र, खोके घेऊन स्थापन झालेल्या सरकारचे लक्ष केवळ पैसा हाच आहे. राज्यात कायदा सुवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अधिकारीही याकडे गांभीर्याने बघत नसून, इच्छितस्थळी बदली करुन घेण्यासाठी सरकारला पैसे देत आहे.

कारण त्यांनाही माहित आहे की हे सरकार अल्प दिवसांचे आहे. काही दिवसांतच हे सरकार कोसळणार असून निवडणूका लागतील असा आशावाद ठाकरे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT