beggars at signal esakal
नाशिक

Nashik News : पाल्याला शिकवू की पालकांना?; सिग्नलवर भीक मागणाऱ्या विद्यार्थ्यांवरून प्रशासन पेचात!

विक्रांत मते

नाशिक : शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करताना महापालिकेच्या पथकाला २९ बालके सिग्नलवर भीक मागताना आढळली. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थलांतरित प्रोत्साहन भत्ता देण्याबरोबरच शाळांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. मात्र, सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांकडूनच प्रोत्साहन मिळत असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला असून, पाल्यांआधी पालकांची शाळा घेण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. (administration in confusion by students begging on signal Nashik Latest Marathi News)

महापालिकेकडून शालाबाह्य मुलांची सर्वेक्षण मोहीम २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात आली. यंदा २९ मुले शालाबाह्य आढळले. मागील वर्षी ४९ मुले शालाबाह्य आढळली होती. शालाबाह्य मुलांची संख्या वीसने घटली आहे.

ही बाब समाधानकारक असली तरी ज्या २९ मुलांना महापालिकेच्या शिक्षण विभागाला शाळेच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे, त्या मुलांना मात्र शिक्षण नकोसे आहे. त्याला कारण म्हणजे भीक मागण्यासाठी किंवा शिक्षण नको म्हणून पालकांकडूनच प्रोत्साहन मिळत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शंभर टक्के शिक्षण पोचण्यासाठी शालाबाह्य मुलांच्या अगोदर त्यांच्या पालकांची शाळा घेण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद

शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी १०७५ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली होती. ३ ते १८ या वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. साखर कारखाने, दगडखाणी, वीटभट्ट्या, औद्योगिक वसाहती, सिग्नल आदी ठिकाणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये २९ मुले स्थलांतरित होऊन आल्याचे दिसून आले, तर नऊ मुले शहरातून अन्य त्रस्त स्थलांतरित झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

स्थलांतरित होऊन आलेल्या मुलांना शिक्षण हमीकार्ड दिले जाणार आहे. खासगी किंवा महापालिकेचे शाळेत प्रवेश देऊन त्या मुलांची शाळेतील उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी प्रोत्साहन भत्ता व उपस्थिती भत्ता देण्याची तरतूद केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

Paithan: संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात पहिले रिंगण उत्साहात; मिडसांगवीत भक्तिमय वातावरण

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

SCROLL FOR NEXT