administration is preparing to use coal for the funeral 
नाशिक

अंत्यसंस्कारासाठी कोळसा वापरण्याची वेळ! वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव

औष्णिक वीज केंद्रातून कोळसा मागवून त्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे

विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाबरोबरच मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. शहरातील सर्व म्हणजे सतरा स्मशानभूमीमध्ये जागा शिल्लक नसल्याची अडचण निर्माण होत असताना आता लाकूडफाटाही संपत आला आहे. त्यामुळे एकलहरे औष्णिक वीज केंद्रातून कोळसा मागवून त्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. त्यासंदर्भात औष्णिक वीज केंद्राच्या काही अधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिल्याचे समजते.

शहरातील पंचवटी, नाशिक रोड, पूर्व, सिडको, सातपूर या पाच विभागांमध्ये सतरा स्मशानभूमी आहेत. यातील सर्वाधिक अंत्यसंस्कार पूर्व विभागातील अमरधाम व पंचवटी विभागातील स्मशानभूमीमध्ये होतो. सहा विभागांत जानेवारी ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीत एक हजार ६४५ टन लाकडांचा वापर अंत्यसंस्कारासाठी करण्यात आला. एरवी सरासरी महिन्याला शंभर ते सव्वाशे टन लाकडांचा वापर अंत्यसंस्कारासाठी होतो. परंतु, साडेतीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर झाल्याने सध्या नाशिक अमरधाम व पंचवटी अमरधाममध्ये लाकडांची टंचाई निर्माण झाली आहे.

सात ते आठ तासांचे वेटिंग

नाशिक अमरधाममध्ये विद्युत व गॅस शवदाहिनी आहेत. दोन्ही दाहिनींवर एक मृतदेहासाठी पाच ते सात मिनिटं लागत असले तरी त्यानंतर सफाई करावी लागत असल्याने साधारण दीड ते दोन तास लागतात. मात्र, मृतांची संख्या वाढल्याने प्रशासनाने लाकडावर अंत्यसंस्कारास परवानगी दिली आहे. बहुतांश नागरिकांकडून लाकडांवर अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला जात असल्याने सात ते आठ तासांचे वेटिंग असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रस्ताव मागविला

लाकूडफाटा संपुष्टात आल्याने कोळशावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू आहे. औष्णिक वीज केंद्राकडून कोळसा पुरवठ्याचा प्रस्ताव मागविण्यात आल्याचे समजते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शतक झळकावल्यावर विराट कोहलीचा मैदानावर नागीण डान्स, Video होतोय तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : दिल्ली विमानतळावरून पुण्याकडे येणारे इंडिगो कंपनीचे विमान कोल्हापूरतच अडकले

Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन; ज्येष्ठ वकील, माजी राज्यपाल अन्... 'अशी' होती कारकिर्द

Bharat Taxi Launch : झिरो कमिशनसोबत ‘भारत टॅक्सी’ सेवा लॉन्च; मिळणार अल्प दरात राइड्स, जाणून घ्या दर आणि बुकिंग प्रक्रिया

Ashes: मिचेल स्टार्कनं इतिहास घडवला; हॅरी ब्रुकची विकेट घेऊन वसिम अक्रमचा विक्रम मोडला, पाकिस्तानी दिग्गज म्हणाला...

SCROLL FOR NEXT