Godavari Project
Godavari Project esakal
नाशिक

Nashik : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता; नाशिक,नगर आणि औरंगाबाद सिंचनाला फायदा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत सर्वसाधारण आणि आदिवासी क्षेत्रातील गोदावरी नदीच्या उपनद्यांवरील आहे. या प्रकल्पाच्या एक हजार ४९८ कोटी ६१ लाखांच्या चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालास जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. या प्रकल्पामुळे नाशिक, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ७४ हजार २१० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

प्रकल्पात वाघाड, करंजवण, पालखेड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव अशा सहा प्रकल्पांचा समावेश आहे. करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणे या प्रकल्पांच्या स्थिरीकरणासाठी देवसाने (मांजरपाडा) वळण योजना व इतर ११ प्रवाही वळण योजनांचा समावेश आहे. (Administrative Approval of Upper Godavari Project Nashik Nagar and Aurangabad benefit from irrigation Nashik News)

यापूर्वीच्या तीन मान्यतेनंतर आता २०१८-१९ च्या दरसूचीनुसार चौथ्यांदा प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या रकमेमध्ये १ हजार ३९४ कोटी ६ लाख रुपये कामासाठी खर्च अपेक्षित आहेत. उरलेल्या १०४ कोटी ५५ लाख रुपये अनुषांगिक बाबींवर खर्च केले जातील. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालातील मुद्यांची पूर्तता आता करावी लागणार आहे. त्याचबरोबर आणखी खर्चाचा बोजा वाढेल अशा नवीन बाबींचा समावेश सरकारच्या मान्यतेशिवाय प्रकल्पात करता येणार नाही.

अपूर्ण कामे होतील पूर्ण : भुजबळ

मांजरपाडासह वळण योजनांची आणि पुणेगाव, दरसवाडी, ओझरखेड, पालखेड कालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, की नाशिक जिल्ह्यांतील ११ प्रवाही वळण योजनांसाठी २०६ कोटी ५१ लाख, देवसाने-मांजरपाडा प्रकल्पासाठी ४६४ कोटी ४० लाख, वाघाड प्रकल्पासाठी पाच कोटी सात लाख, करंजवण प्रकल्पासाठी सात कोटी ७६ लाख, ओझरखेडसाठी ८ कोटी १३ लाख, पालखेडसाठी तीन कोटी ६१ लाख, तिसगावसाठी ५० कोटी सात लाख, पुणेगावसाठी १२ कोटी पाच लाख असे एकुण ७६० कोटी ६१ लाखांच्या निधीस मान्यता मिळाली आहे.

कालवा व वितरकांच्या दुरुस्तीसाठी ६३३ कोटी ४५ लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यात वाघाडच्या ११ कोटी ९७ लाख, करंजवणच्या ४ कोटी ९८ लाख, ओझरखेडच्या ७३ कोटी १८ लाख, पालखेडच्या ६७ कोटी ९० लाख, तिसगावच्या ६६ लाख, पुणेगावच्या २९४ कोटी ९६ लाख, तर दरसवाडीच्या १७९ कोटी ७९ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT