Advance Traffic Management System esakal
नाशिक

Traffic Management System: शिर्डी महामार्गावर ॲडव्हान्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम! रहदारीचे होणार नियंत्रण

अजित देसाई

Traffic Management System : सिन्नर आणि कोपरगाव तालुक्यातून समृद्धी महामार्गाला समांतर असणाऱ्या सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासह आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका पोलिसांची मदत पोहोचवण्यासाठी ॲडव्हान्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे.

यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यासोबतच महामार्गावर होणारे अपघात आणि गुन्हेगारी घटना कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर सिन्नर ते शिर्डी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही यंत्रणा कार्यान्वित केली असून यात ठिकठिकाणी 360 अंशात फिरणारे पिटीझेड कॅमेरे, व्हीआयडीएस कॅमेरे तसेच डिजिटल मार्गदर्शक फलक बसवण्यात आले आहेत. (Advance Traffic Management System on Shirdi Highway Traffic will be controlled nashik news)

हायब्रीड एन्यूईटी मॉडेल तत्वावर बनवण्यात आलेला सिन्नर-शिर्डी महामार्ग नाशिक-पुणे महामार्गावरील गुरेवाडी फाटा येथून सुरू होतो. तर कोपरगाव तालुक्यातील सावळीविहीर फाटा येथे संपतो.

देशभरातील साई भक्तांचा राबता असलेल्या या महामार्गावर वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे, रस्ता लूटसारखे प्रकार थांबावेत, अपघातांना आळा बसावा, अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत व्हावी,

महामार्गावरील वाहतुकीतील अडथळ्यांची मालिका दूर होऊन साई भक्तांचा आणि या मार्गावरील वाहनधारकांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ॲडव्हान्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम तथा आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे.

या यंत्रणेमुळे अपघात झाल्यास अवघ्या पाच ते दहा मिनिटात पिंपरवाडी टोल नाका येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होईल आणि जखमींना मदत मिळेल.

वाहतूक ठप्प झाल्यास किंवा महामार्गावर काही अडथळे असल्यास साईन बोर्डवर त्याचेही मेसेज झळकतील व प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीतील सूचना दिल्या जातील.

हीआधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महामार्गाचे काम सुरू असतानाच रस्ते बांधणीचे काम करणाऱ्या मोंटेकार्लो कंपनीने दुभाजकात ५० किलोमीटर अंतरात ऑप्टिकल फायबर केबल टाकली आहे.

या प्रणाली अंतर्गत सिन्नर- शिर्डी महामार्गाच्या ५० किलोमीटर अंतरात ८ ठिकाणी व्हीआयडीएस तथा व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्टिव्ह सिस्टीम (सिसीटीव्ही) कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.

३६० डिग्रीत फिरून परिसरावर नजर ठेवणारे पिटीझेड (पॅन टिल्ट झूम) हे कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.

याशिवाय ४ ठिकाणी इलेक्ट्रिक संदेश यंत्रणा फलक (व्हेरिएबल मेसेज साईन बोर्ड) या महामार्गावर वेगवेगळ्या सूचना देण्यासाठी बसवण्यात आले आहेत. ही सर्व यंत्रणा पिंपरवाडी टोलनाका येथून नियंत्रित करण्यात येईल.

३६० अंशात फिरणारे पिटीझेड कॅमेरे मुसळगाव आणि दातलीच्या मध्ये, खोपडी जवळ, पांगरी आणि वावीच्या मध्ये, वावी आणि टोलनाक्याच्या दरम्यान, टोलनाका आणि पाथरे, पाथरे आणि देर्डे, देर्डे आणि झगडा फाटा यादरम्यान बसवण्यात आले आहेत.

तर व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्टिव्ह सिस्टीम दातली, खोपडी आणि पांगरी, वावी आणि देर्डे शिवारात कार्यान्वित करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

व्हेरिएबल मेसेज साईन बोर्ड गुरेवाडी फाट्यापासून ६ किमीवर मुसळगाव जवळ, १५ किमीवर खोपडी आणि पांगरीच्या दरम्यान, २४.५ किमीवर वावी शिवारात आणि ३७ किमीवर पाथरे आणि देर्डेच्या मध्ये बसवण्यात आले आहेत.

त्यावर वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका, दारू पिऊन वाहन चालवू नका असे संदेश वाहन चालकांचे प्रबोधन करतील. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत चालकांना सूचना देखील दिल्या जातील. या प्रणालीद्वारे संपूर्ण महामार्ग सुरक्षित करण्यात आला आहे.

ॲडव्हान्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम मुळे वाहनांच्या अनियंत्रित वेगावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. नियंत्रण कक्षातून ओव्हरस्पीड धावणाऱ्या वाहनांचे नंबर आरटीओला पाठवले जातील. आणि आरटीओ मार्फत या वाहनांवर कारवाई केली जाईल.

"महामार्गावर कडेला ठिकठिकाणी एटीएमएस प्रणाली बसवण्यात आली आहे. त्याद्वारे वाहन चालकांना थेट टोल नाक्यावरील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदत मागता येईल. या यंत्रणेद्वारे गुन्हेगारी सोबतच अपघातांना आळा बसेल. शिवाय अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळेल.‌ आपत्कालीनवेळी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन होईल.‌ महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचे वर्गीकरणही करता येईल. राष्ट्रीय महामार्गाचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे."

- दिलीप पाटील, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT