Adv. Bhagirath Shinde esakal
नाशिक

Rayat Shikshan Sanstha : रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी पुन्हा ॲड. भगीरथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

Rayat Shikshan Sanstha : महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या नामवंत नावाजलेल्या व शाखा विस्तार असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी पुन्हा अॅड भगीरथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Advocate bhagirath shinde Again as Vice Chairman of Ryat Shikshan Sanstha nashik news)

देशातील सर्वात मोठ्या महाविद्यालय, माध्यमिक शाळा आश्रम शाळा इंजीनियरिंग व इतर 739 शाखा असलेल्या व साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या नव्याने निवडून आलेल्या मॅनेजिंग कौन्सिल ची पहिली बैठक काल पुणे येथे संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अॅड भगीरथ शिंदे यांची प्रशासनावर असलेली पक्कड तसेच संस्थेत सुरू केलेले नवीन शैक्षणिक उपक्रम व त्यातून शाखा आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी करीत असलेले प्रयत्न तसेच सेवक व ग्रामस्थांमध्ये निर्माण केलेले सोलोख्याचे संबंध यातून त्यांची पुन्हा व्हाईस चेअरमन पदी निवड झाली आहे.

भगीरथ शिंदे हेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या ठाणगावचे असून त्यांचे बंधू कै रावसाहेब शिंदे हे रयतचे चेअरमन होते तर स्व अण्णासाहेब शिंदे हे भारताचे कृषिमंत्री होते. भगीरथ शिंदे यांना समाजकारण आणि राजकारणाचा वारसा लाभलेला असून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT