Transfers esakal
नाशिक

राज्यात सत्तांतरानंतर पुन्हा पोलिस अधिकारी बदल्यांसाठी सक्रिय

नरेश हाळणोर

नाशिक : गेल्या महिन्यातील राजकीय उलथापालथीनंतर महिलाअखेरीला सत्तांतर होऊन नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात होणाऱ्या राज्यभरातील पोलिस अधिकारी (Police officers) बदल्यांसाठी (Transfers) पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यासाठी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्या सुरू झाल्याच्या चर्चा पोलिस दलात होऊ लागल्या आहेत. (After change of government in state transfer of police officers active maharashhtra politics news)

गेल्या महिन्यात गृहखात्यांतर्गत पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते पोलिस निरीक्षकांच्या बदल्या होणे अपेक्षित होते. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी सेटिंगही लावले होते. परंतु, राज्यसभा आणि त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीच्या व्यस्तेमुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून ३० जूनपर्यंत पोलिस बदल्या न करण्याचा अध्यादेश जारी केला होता. मात्र, याच दरम्यान, मविआ सरकारच गडगडले. शिवसेनेतील फुटीमुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागल्याने, बदल्यांसाठी पोलिस अधिकाऱ्यांनी लावलेली सेटिंग मागे पडली आहे.

गृहखाते भाजपकडे?

नव्याने शिवसेना बंडखोर आमदारांचा गट व भाजपचे सरकार राज्यात अस्तित्वात आले आहे. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसला तरीही गृहखाते हे भाजपकडे येईल, अशीच चर्चा पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने बदल्यांसाठी इच्छुक असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यादृष्टिकोनातून सेटिंग लावणे सुरू केले आहे. त्यासाठी काही अधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत. काहींनी भेटीगाठीही घेणे सुरू केले आहे.

अनेकांची टर्म पूर्ण

पोलिस अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या दर्जानुसार दोन ते सहा वर्षांचा कालावधी असतो. त्यानुसार, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या चारपैकी तीन अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. याशिवाय शहर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळही पूर्ण झालेला असल्याने या अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागलेले आहेत. परंतु, इच्छितस्थळी बदली होण्यासाठी असे अधिकारी गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रयत्नात आहेत. आता तर सरकारच बदलल्याने पुन्हा नव्याने जोरदार प्रयत्न या पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT