Who is most harassed  sakal
नाशिक

अखेर वृद्ध माता-पित्यांना सांभाळण्याचे मुलांकडून अभिवचन

आपल्या भावांनी वृद्ध माता-पित्यांचा सांभाळ कारावा

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

सिडको : आयुष्याच्या सायंकाळी ‘आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मनी’ असे गुणगुणत, हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या पोटच्या मुलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या वृद्ध-माता-पित्यांना अखेर त्या ‘लेकरांनी’ आपल्या घरट्यात सामावून घेतले आहे. त्यांची ही उदात्त वृत्ती व ‘सकाळ’च्या समाजाभिमुख वार्तांकनाबद्दल समाज बांधव, कुटुंबीय व ग्रामस्थांकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नांदगाव रोडवरील तळेगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या छोट्याशा खेडेगावात हे वृद्ध दाम्पत्य एकाकी जीवन जगत होते. वृद्ध वडिलांचे वय ९४ तर, आईचे ९० वर्षे आहे. चार मुलं, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा भला मोठा गोतावळा असून, एक मुलगा कंडक्टर, दुसरा मुख्याध्यापक, तिसरा शिक्षक व चौथा मुलगा संगीतकार आहे. एक मुलगी नाशिकला, तर दुसरी धुळे येथे राहते. त्यांच्यापैकी कुणीही आई-वडिलांसोबत राहात नसल्याने त्यांचे जीवन खडतर झाले होते. अशात, आपल्या भावांनी वृद्ध माता-पित्यांचा सांभाळ कारावा, यासाठी मुलगी मनीषा हिने दोन वर्षापासून खूप प्रयत्न केले. अखेर याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करताच, मुलांनी तातडीने गावी धाव घेत आई-वडिलांची भेट घेतली. तसेच, बहिणीची भेट घेऊन, आम्ही आई-वडिलांचा सांभाळ करू, असे आश्‍वासन देतानाच झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. मुलांच्या या निर्णयाबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, ‘सकाळ’ने दिलेल्या वृत्ताबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji University Vice Chancellor : शिवाजी विद्यापिठाला तब्बल ९ महिन्यांनी कुलगुरू पद मिळालं; राज्यपालांकडून नियुक्ती

Pashan Lake Suspension Rollback: पाषाण तलाव प्रकरणासह पाच अधिकाऱ्यांचे निलंबन मागे; विभागीय चौकशी रद्द करून केवळ बदलीवर समाधान

Latest Marathi News Live Update : बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

'ठरलं तर मग'मधून जुन्या साक्षी शिखरेची एक्झिट; तिच्याजागी मालिकेत दिसणार नवी अभिनेत्री, हे आहे कारण

Pune Solapur Accident: लोणी काळभोरमध्ये गॅस टँकरची दुचाकीला धडक; तानाजी काळभोर यांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT