After evening atmosphere feels extremely cold nashik news 
नाशिक

Nashik News : सायंकाळनंतर वातावरणात गारवा..! किमान तापमान 14.5 पर्यंत खालावले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ऑक्‍टोबर हिटचा सामना केल्‍यानंतर आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. दिवसाच्‍या वेळी तप्त सूर्य किरणांमुळे काही प्रमाणात गरम होत असले तरी सायंकाळनंतर मात्र वातावरणात कमालीची थंडी जाणवते आहे.

शनिवारी (ता. २८) नाशिकचे किमान तापमान १४. ५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, यंदाच्‍या हंगामातील हे निचांकी तापमान आहे. गेल्‍या आठवड्याभरात किमान तापमानात सात अंश सेल्सिअसपर्यंत घसरण झालेली आहे. (After evening atmosphere feels extremely cold nashik news)

नाशिककरांना सध्या वातावरणातील बदलांचा सामना करावा लागतो आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीपर्यंत उकाडा जाणवत असताना, गेल्‍या आठवड्याभरापासून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. विशेषतः सायंकाळनंतर सूर्योदयपर्यंत गारठा टिकून राहात असल्‍याने दिवसा उष्ण आणि सायंकाळनंतर मात्र थंड अशा मिश्र वातावरणाची अनुभूती नागरिकांना घ्यावी लागत आहे.

नाशिकचे कमाल तापमान ३० अंशाहून अधिक राहात असताना दुसरीकडे किमान तापमानात सातत्‍याने घट होत चालली आहे. गेल्‍या आठवड्याभरात किमान तापमानात सात अंश सेल्सिअसपर्यंत घसरण नोंदविली गेली आहे. व येत्‍या काही दिवसांमध्ये पारा आणखीच खालावण्याची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली आहे. त्‍यामुळे दिवाळीपूर्वीच नाशिककरांना हुडहुडी भरण्याची चिन्‍हे निर्माण झालेली आहेत.

आरोग्‍याची काळजी घेण्याचा सल्‍ला

वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजार बळावत असतात. या पार्श्वभूमीवर वृद्ध, लहान मुलांसह दम्याचे आजार असलेल्‍या व्‍यक्‍तींनी अशा वातावरणात आरोग्‍याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्‍ला वैद्यकीय तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे.

आठवड्याभरातील किमान

तापमान असे (अंश सेल्सिअसमध्ये)-

दिनांक किमान तापमान

२१ ऑक्‍टोबर २१.९

२२ ऑक्‍टोबर १९.८

२३ ऑक्‍टोबर १७.८

२४ ऑक्‍टोबर १८.०

२५ ऑक्‍टोबर १७.६

२६ ऑक्‍टोबर १५.३

२७ ऑक्‍टोबर १५.०

२८ ऑक्‍टोबर १४.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT