monkey died.jpg 
नाशिक

... अन् मूर्ती प्राणप्रतिष्ठा होताच 'त्याने' सोडला प्राण!...गावकऱ्यांचे अश्रू अनावर...

सकाळवृत्तसेवा

नाशिक / लासलगाव : खडक माळेगाव (ता. निफाड) येथील मारुती मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच वानराने प्राण सोडल्याची घटना येथे घडली. तब्बल एक वर्ष या वानराने गावातच मुक्काम ठोकला होता. या वानराचा अकाली मृत्यू ग्रामस्थांना चटका लावणारा ठरला. 

असा आहे प्रकार

खडक माळेगाव येथे जुने हनुमान मंदिराचा जीर्णोधार करण्याचे काम सुरू होताच गावामध्ये पाच ते सहा वानरांचे आगमन झाले होते. कालांतराने यातील एक वानर सोडून सर्व वानरे निघून गेली होती. वेळोवेळी या वानराचे इतर जोडीदार त्यास घेऊन जाण्यासाठी येत होते. मात्र वानर मंदिर परिसर सोडण्यात तयार नव्हते. तब्बल एक वर्ष या वानराने गावातच मुक्काम ठोकला होता. शनिवारी (ता. 29) हनुमानाचे नवीन मंदिर पूर्ण होऊन कलशपूजा झाली. त्यासह मंदिरात हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठादेखील करण्यात आली. मात्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच वानर बेशुद्ध पडले असेल म्हणून ग्रामस्थांनी लागलीच वानरास निफाड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्‍टरांनी ते मृत झाल्याचे सांगितले. दुपारी 4 वाजून 50 मिनिटांनी वर्षभर मुक्काम ठोकलेल्या वानराने प्राण सोडले. एकीकडे मंदिर झाल्याचा आनंद, तर दुसरीकडे हनुमानभक्त वानराचा मृत्यू झाला. 

परिणामी, बुधवारी सायंकाळी महादेव मंदिर प्रांगणात या वानराचा ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केला. परिणामी, रात्री या वानराचा महादेव मंदिरासमोरील पटांगणात अंत्यविधी करण्यात आला. तब्बल एक वर्षभर गावात राहिलेल्या या वानराचा अकाली मृत्यू ग्रामस्थांना चटका लावणारा ठरला. 

गाव हनुमानभक्ताला मुकले 

जुने मंदिर पाडल्यापासून ते नवीन मंदिराचे काम होईपर्यंत हे हनुमानभक्त गावातून हलले नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूत वानर गावातच राहिले. मात्र वर्षभरानंतर वानराचा मृत्यू ग्रामस्थांना चटका लावणारा ठरला. - दत्ता रायते (माजी संचालक, ला.कृ.उ.बा.)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT