after retirement hobby.jpg
after retirement hobby.jpg 
नाशिक

''अवलिया''चा थक्क करणारा कारऩामा!...मोदींना सुध्दा घ्यावी लागली दखल! 

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन म्हणजे आयुष्या च्या डावातील सेकंड इनिंग असते. गांधीनगर प्रेसमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जोपासला हा छंद की सगळे झाले थक्क... टाकळी रोड येथे राहणाऱ्या एका 87 वर्षीय अवलियाचा हा छंद त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. 

स्वाक्षऱ्या घेऊन त्या संग्रही ठेवण्याचा हा छंद 

नारायण रामचंद्र करमासे यांनी आतापर्यंत जवळपास एक हजाराच्या वर स्वाक्षऱ्यांचे संकलन केले आहे. संगणकाच्या व्हर्च्युअल जमान्यात वावरत असतांना करमासे आजोबांनी जपलेला हा छंद चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार, गायक शंकर महादेवन, अभिनेत्री शबाना आझमी, गायक सुरेश वाडकर, अभिनेता मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, ओंकार दादरकर अशा कित्येक नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या संग्रही ठेवण्याचा हा छंद त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. 

आयुष्याच्या डावातील सेकंड इनिंग 

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन म्हणजे आयुष्याच्या डावातील सेकंड इनिंग असते. गांधीनगर प्रेसमधून निवृत्त झाल्यानंतर नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यां चा संग्रह करत श्री.करमासे यांनी नवीन छंद जोपासला. यात राजकारणी, अभिनेते, कलावंत, शास्त्रज्ञ, वैद्यकीय, शैक्षणिक, अध्यात्म, आजी-माजी पोलिस आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार अशा विविध क्षेत्रातील नामवंतांचा समावेश आहे. वहीतील प्रत्येक स्वाक्षरी घेतांना त्यामागची पार्श्‍वभूमी समजावून सांगताना 
श्री. करमासे यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. 

पंतप्रधान मोदींनी पाठविली सही 

नारायण करमासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानांची सही संग्रहित असावी, म्हणून पत्र पाठविले होते. या पत्राची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ दिवसांत श्री. करमासे यांना पत्राने फोटो व सही पाठविली व जोपासत असणाऱ्या छंदाला शुभेच्छाही दिल्या. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT