mother on road.png 
नाशिक

Sakal Impact : "साहेब..मला घरी जायचयं" लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर जीवन जगत असलेल्या माऊलीने अखेर सांगितले..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिडकोतील "त्या' महिलेसंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित महिलेला आम्ही सांभाळतो, असे स्वयंसेवी संस्था चालकांनी सांगितले, तर सरकारवाडा व अंबड पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला. महिलेने घरी जाते, असे सांगितले. दरम्यान, अंबंड पोलिसांनी महिलेचे घर व मुलाचा शोधार्थ पथक तयार केले आहे. 

"त्या' महिलेच्या पाळतीवर अंबड पोलिसांचे पथक 
"वंशाचे दोन-दोन दिवे तरी नशिबी "तिच्या' अंधार' ही बातमी "सकाळ'मध्ये सोमवारी (ता. 20) प्रसिद्ध झाल्यानंतर या महिलेवर ओढावलेल्या प्रसंगामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सोशल मीडियावरही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यातील काहींनी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. याबाबत "सकाळ'शी काहींनी संपर्कही साधला. सरकारवाडा पोलिसांना सोमवारी सायंकाळी जुना सीबीएस येथील सिग्नलजवळ ही महिला मिळून आली. पोलिसांनी तिला वृद्धाश्रमात जाण्याचा पर्याय सांगितला. मात्र त्या महिलेने सिडकोतील घरी जाऊन राहते, असे सांगत ती निघून गेली. दरम्यान, अंबड पोलिसांनी संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचे घर व तिचा मुलगा काम करीत असलेल्या गॅरेजचा शोध घेण्यासाठी पथक नियुक्त केले आहे. 

स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार; महिलेची घरी जाण्याची इच्छा 
"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वाचले व त्या संदर्भातला व्हिडिओसुद्धा मी पाहिला. पोलिस पथकाने सोमवारी स्मार्ट रोड परिसरात तपास केला असता सायंकाळी जुना सीबीएस येथील सिग्नलजवळ ही महिला मिळून आली. या महिलेशी बोललो असता, तिने वृद्धाश्रमात जाण्यास नकार दिला. मी माझ्या सिडकोतील घरी जाते, असे सांगून ती निघून गेली. - हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा 

"सकाळ'मधील बातमी वाचल्यानंतर आम्ही विशेष पथक तयार केले आहे. या पथकामार्फत त्या वृद्धेच्या मुलांचा शोध घेतला जाईल. त्यातील एक मुलगा गॅरेजमध्ये काम करत असल्याने त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे. - कुमार चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR, RCB यांची एकत्रित ३१ हजार कोटींना विक्री; पण, यामधून BCCI ला किती रक्कम मिळणार?

निरुपा सत्याला स्वीकारणार ? स्टार प्रवाहच्या साधी माणसं मालिकेचा असा होणार शेवट ! प्रोमो रिलीज

Latest Marathi News Live Update : २०१२ ला खरातला बंदुकीचा परवाना दिला - सुषमा अंधारे

'त्या' एका कृतीमुळे यामी गौतम आदित्य धरच्या पडली प्रेमात, नंतर हिमाचलमध्ये..

“महाराष्ट्राची हास्यजत्रा" कार्यक्रमात समीर चौघुले सादर करणार भन्नाट कथ्थक नृत्य !

SCROLL FOR NEXT