Dr Zakir Hussain Hospital 
नाशिक

झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेनंतर तब्बल २८ कर्मचारी पॉझिटिव्ह

तातडीने नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

विक्रांत मते

नाशिक : बेडची कमतरता, तर कधी ऑक्सिजन गळती या अनेक कारणांमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले असून, आठ दिवसांत तब्बल २८ कर्मचारी बाधित झाल्याची बाब समोर आली आहे. यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय सेवेवर मोठा ताण निर्माण झाला असून, तातडीने नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिकेने नवीन बिटको, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय कोविड सेंटर म्हणून जाहीर केले. या दोन्ही रुग्णालयांत इतर रुग्णसुद्धा तपासले जात होते. परंतु वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे दोन्ही हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून जाहीर करण्यात आले. दोन्ही रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. बिटको रुग्णालयात सध्या ७४१ रुग्ण उपचार घेत आहेत, तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात पावणेदोनशे रुग्ण उपचार घेत आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात तीन-तीन शिफ्टमध्ये सुमारे शंभरच्या आसपास कर्मचारी काम करत आहे. यात नर्सेसची संख्या मोठी आहे. रुग्णांची सेवा करताना मास्क, पीपीई किट आदी साहित्य महापालिकेतर्फे पुरविण्यात आले आहे. असे असतानाही आठ दिवसांत २८ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये १४ नर्स, दोन डॉक्टर व इतर तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दुर्घटनेनंतर चार ते पाच दिवसांत संसर्ग

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला ऑक्सिजन भरताना गळती होऊन मोठी दुर्घटना घडली होती. यात २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. दुर्घटना घडली, त्या वेळी रुग्णालयात उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. रुग्णांना इतरत्र हलविण्यापासून तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कामात सहभाग घेतला. दुर्घटनेनंतर चार ते पाच दिवसांत कार्यरत कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचा अंदाज रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस अखेर रस्त्यावर; कसे असेल वेळापत्रक?

Mumbai Crime: बॉस समजून पैसे पाठवले, पण घडलं विचित्रच; फसवणुकीतील ५.७५ कोटी रोखले, दिल्लीतून पाच जण अटकेत

IPL 2027: युवराज सिंगची IPL मध्ये नवी इनिंग! पुढील वर्षापासून 'या' भूमिकेत दिसणार?

Raigad News: महायुतीत बिघाडी! शेकापला भाजप-राष्ट्रवादीचा पाठिंबा, पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत फूट

Shivajirao Adhalrao Patil : आपल्या भागातून रेल्वे निघून जाण्यास विद्यमान खासदार जबाबदार

SCROLL FOR NEXT