Corona Patient esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात पुन्हा वाढतेय कोरोनाची रुग्णसंख्या

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्‍या संख्येत वाढ होऊ लागली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी पन्नास रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्‍या संख्येत वाढ होऊ लागली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी पन्नास रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली.

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्‍या (Corona Patients) संख्येत वाढ (Increase) होऊ लागली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी पन्नास रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. गुरुवारी (ता. ३०) जिल्ह्यातील ८२ रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive) आले. पन्नास रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. मृतांचा आकडा निरंक राहिला. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ४८७ वर पोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्‍या प्रादुर्भावाच्या केंद्रस्‍थानी नाशिक शहर राहात आहे. गुरुवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील पन्नास, नाशिक ग्रामीणमधील २९ रुग्‍णांचे, तर जिल्‍हाबाहेरील तीन रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आले. पन्नास रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्‍यू झालेला नसल्‍याची नोंद आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ४५१ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक एक हजार २४१ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. नाशिक शहरातील १२१, मालेगावच्‍या ८९ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात अकरा रुग्‍ण दाखल झाले. यापैकी चार रुग्‍ण जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल झाले. यापूर्वी बहुतांश वेळा दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पन्नास किंवा त्‍यापेक्षा कमी राहात होती. परंतु आता नाशिक महापालिका क्षेत्रातच पन्नास बाधित आढळू लागले आहेत. ही धोक्‍याची घंटा ठरण्याची शक्‍यता असून, जिल्‍हावासीयांनी सतर्क राहाण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT