Again Nashik city Around Corona vilakha sakal
नाशिक

नाशिक शहराभोवती पुन्‍हा कोरोनाचा विळखा

डिसेंबरमध्ये बदलली स्‍थिती : अडीचशे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव सौम्‍य गतीने पुन्‍हा वाढू लागला आहे. जिल्‍ह्यातील बाधितांच्‍या वाढीच्‍या केंद्रस्‍थानी पुन्‍हा नाशिक शहर आले आहे. डिसेंबरमध्ये ही स्‍थिती बदलली असून, नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्रातील सक्रिय रुग्‍णसंख्येत ११५ ने वाढ झाली आहे. शनिवार (ता. २५)पर्यंत नाशिक शहरात अडीचशे बाधितांवर उपचार सुरू आहेत. शहराभोवती कोरोनाचा विळखा पुन्‍हा घट्ट होत असल्‍याची सध्याची स्‍थिती आहे.

कोरोना महामारीच्‍या पहिल्‍या व दुसऱ्या लाटेत नाशिक महापालिका क्षेत्राला मोठा फटका बसला होता. मात्र, काही कालावधीपासून ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढत असताना, तुलनेत शहरात घट झाली होती. ग्रामीण क्षेत्रातही निफाड, सिन्नर, येवला या तालुक्‍यांमध्ये आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक राहत होती. मात्र, डिसेंबरमध्ये परिस्‍थिती पूर्णपणे बदलली. २५ दिवसांमध्ये एकीकडे ग्रामीण भागात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत शंभराहून अधिकची घट झाली असताना, नाशिक शहरात मात्र या संख्येत ११५ ने वाढ झाली आहे. मृतांचा आकडाही अधिक राहिला आहे. गेल्‍या ३० नोव्‍हेंबरला नाशिक महापालिका क्षेत्रात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या १३५ होती. ही संख्या शनिवारी अडीचशेवर पोचली आहे. नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येपेक्षा कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या कमी राहत असल्‍यानेही ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत वाढ झाली आहे.

नियमांकडे दुर्लक्ष नको

सण-उत्‍सव काळात शहर परिसरातील बाजारपेठा गजबजल्‍या होत्‍या. तेव्‍हापासून बाजारपेठांमध्ये कायमच वर्दळ बघायला मिळत आहे. विशेषतः सार्वजनिक सुटी, शनिवारी-रविवारी सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी बघायला मिळत आहे. त्यातच कोरोना प्रादुर्भावाचा धोकाही वाढत आहे. मास्‍कचा वापर, सोशल डिस्टंन्‍सिंग आदी नियमांकडे दुर्लक्ष करणे धोक्‍याचे ठरू शकते.

आठवड्याची रुग्णसंख्या

कोरोनाच्या रुग्णसंख्येचा जोर या आठवड्यात कसा राहील, यावर साप्ताहीक बैठकीत निर्बंधाचे स्वरूप ठरणार आहे. रुग्णसंख्या वाढली, तर नियम आणखी कडक होऊन बंधने वाढणार, अशी शक्यता आहे. तूर्तास प्रशासनाने परवानगीशिवाय कुठल्याही कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. सध्याच्या नियमात ५० टक्के उपस्थितीचा नियम आहे. पुढील तीन-चार दिवसांतील कोरोना रुग्णसंख्येच्या आलेखावर निर्बंधाची तीव्रता ठरणार आहे. त्यामुळेच हॉटेल व्यावसायिक, सामान्य नागरिकांसह प्रशासनाचेही रुग्णसंख्येच्या आलेखाकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT