Vaccination
Vaccination  sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात नऊ हजार मुलांना एकाच दिवशी लस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना प्रतिबंधक १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यासाठी आता लस ग्रामीण भागात पोचली. आज सायंकाळपर्यंत एका दिवसामध्ये जिल्ह्यातील ८ हजार ६३८ मुलांचे पहिले लसीकरण झाले. आजअखेर एकूण दहा हजार ९१२ मुलांना लस देण्यात आली असून दोन हजार २७४ मुले नाशिक शहरातील आहेत. ग्रामीण-आदिवासी भागामध्ये शाळांमधून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने परीक्षा असलेल्या व्यतिरिक्तच्या शाळांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

नाशिक आणि मालेगाव शहरासह जिल्ह्यातील एकूण ८१८ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील ३५ केंद्रे नाशिक, तर २९ केंद्रे मालेगाव शहरातील आणि उर्वरित ७५४ केंद्रे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील एकूण ४५ लाख १२ हजार ४०२ लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील ३३ लाख १५ हजार ७१३ जणांमधील २८ लाख ९९ हजार ८०७ म्हणजेच, ८७.४६ टक्के जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच २२ लाख ९० हजार ८५२ म्हणजेच ६९.०९ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त

सेच नाशिक शहरातील एकूण १८ लाख ५५ हजार ९१० लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील १३ लाख ६३ हजार ७२३ जणांमधील १२ लाख ८३ हजार २८ म्हणजे ९४.०८ टक्के जणांना पहिला, तर १० लाख ४३ हजार ५६९ म्हणजे ७६.५२ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मालेगाव शहरातील एकूण सहा लाख ७५ हजार ६३३ लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील चार लाख ९६ हजार ४५४ जणांपैकी तीन लाख १६ हजार ६०३ म्हणजे ६३.७७ टक्के जणांना पहिला व एक लाख तीन हजार १७५ म्हणजे २०.७८ टक्के जणांना दुसरा डोस दिला आहे. अशा एकूण जिल्ह्यातील ७० लाख ४३ हजार ९४३ लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील ५१ लाख ७५ हजार ८८९ जणांपैकी ४४ लाख ९९ हजार ४३८ जणांना म्हणजेच ८६.९३ टक्के पहिला, तर ३४ लाख ३७ हजार ५९६ अर्थात, ६६.४२ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरें घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT