corona e sakal
नाशिक

नाशिक : ६० ते ७० वयोगटात कोरोनाचे मृत्यू सर्वाधिक

विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या व मृत्यूंच्या आकडेवारीचा अहवाल तयार करताना शहरात तीन हजार ९४४ मृत्यू झाले आहेत. त्यात पंचवटी विभागात सर्वाधिक मृत्यू नोंदले गेले आहे. ६१ ते ७० वयोगटात मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची बाब समोर आली आहे.

महापालिकेतर्फे मृत्यूंच्या संख्येची आकडेवारी संकलित केली जात आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या संकलित करताना तीन हजार ९४४ मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

असे आहे मृत्यूचे प्रमाण

एक ते दहा वयोगट ः चार

११ ते २० ः सहा

२१ ते ३० ः ८३

३१ ते ४० ः ३४४

४१ ते ५० ः ६०२

५१ ते ६० ः ९४०

६१ ते ७० ः प्रमाण २७.७६.

७१ ते ८० ः ६५१

८१ ते ९० ः १९८

९१ ते १०० ः २१

या कारणाने झाली वाढ

महापालिका हद्दीत वैद्यकीय सुविधा चांगल्या दर्जाच्या असल्याने नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नगर जिल्ह्यांतील संगमनेर, कोपरगाव भागांतील कोरोनारुग्ण उपचारासाठी नाशिक महापालिका दाखल झाले होते. शासनाच्या कोरोनाविषयक नियमानुसार कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णावर ज्या भागात उपचार झाले, त्याच भागात अंत्यविधी करणे बंधनकारक असल्याने शहरी भागातील आकडेवारी वाढल्याचा दावा केला जात आहे.

विभागनिहाय मृत्यूची आकडेवारी

विभाग एकूण मृत्यू

सिडको ८४०

पूर्व ६९१

नाशिक रोड ८०७

पंचवटी ९२६

सातपूर ३१२

पश्‍चिम ३६८

एकूण ३,९४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT