Rain Kharif Season Farmer esakal
नाशिक

Kharif Season: कृषी पंढरीमध्ये सर्वदूर खरीपासाठीच्या पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा!

सकाळ वृत्तसेवा

Kharif Season : मॉन्सूनचे जिल्ह्यात आगमन झाले असले, तरीही कृषी पंढरीमध्ये सर्वदूर खरीपाच्या पेरण्यालायक वरुणराजाच्या हजेरीची प्रतीक्षा कायम आहे. रिमझिम स्वरूपात काही भागात, तर काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

नाशिकमध्ये आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात ५.२, तर सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Agricultual city waiting for monsoon rains to sowing for Kharif season nashik news)

जिल्ह्यात गेल्यावर्षी जूनच्या अखेरीस ७१.९ टक्के पावसाची नोंद झाली होती. आज सायंकाळपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात पहिल्या महिन्यात २४.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यावरुन गेल्यावर्षीच्या तुलनेत ४७.५ टक्के कमी पाऊस झाला आहे.

आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील काही मंडलनिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : मालेगाव तालुका-कौळाणे-८०.४, सौंदाणे-९६.४, निमगाव-१११.७, कळवण-७०.९, नांदगाव तालुका-जातेगाव-७९.१, सुरगाणा-७०.४, पेठ-८१.२, त्र्यंबकेश्‍वर तालुका-वेळुंजे-११५.३, हरसूल-७६.८, देवळा तालुका-उमराणे-९२.९.

मागील चोवीस तासात मंडलनिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे : दळवट-१४.३, उंबरठाण-१०.३, बोरगाव-११.३, सुरगाणा-९, उमराळे-१०.८, ननाशी-२१.३, इगतपुरी-११.८, धारगाव-१४.८, पेठ-२६, जोगमडी-१८, कोहोर-१०.८, वेळुंजे-२४.८, हरसूल-२८.८. हा अपवाद वगळता इतरत्र पावसाचा जोर कमी राहिला असून पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना आणखी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यातील पावसाची स्थिती

(आकडेवारी मिलिमीटर दर्शवते)

तालुक्याचे नाव आजचा पाऊस आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी गेल्यावर्षी जूनमधील टक्केवारी

मालेगाव ०.५ ६१.७ १८०.४

बागलाण ० २८.८ १२०.५

कळवण ३.५ ४४.२ १०८.१

नांदगाव ० २७ १५२.४

सुरगाणा ८.८ १४.८ ६९.९

नाशिक १.२ ८.२ ६८.६

दिंडोरी ६.९ २० ११३.१

इगतपुरी ८.३ ८.५ २२

पेठ १८.३ १८.४ ७१.३

निफाड ०.५ ३६.२ ११४.५

सिन्नर ०.१ २४ ११८.४

येवला ० ४२.९ ५४

चांदवड ०.५ २२.८ १७६.२

त्र्यंबकेश्‍वर १९.६ २८.५ ४५.५

देवळा ०.२ ५६.५ १४१.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT