Agricultural laborers are getting double wages nashik marathi news 
नाशिक

शेतीकामांमुळे खेडी ओस; मजुरी दुप्पट झाल्याने शेतमजुरांना 'अच्छे दिन' 

गोकुळ खैरनार

मालेगाव : समाधानकारक पावसामुळे तालुक्यासह कसमादे परिसरात खरिपाचे क्षेत्र वाढले. बाजरी, मका आदी खरीप पिके काढण्याची लगीनघाई शेतमळ्यांमध्ये सुरू आहे. त्यातच तलाव, पाझर तलाव, शेततळे, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांनी आगामी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या मिळत असलेला भाव पाहून कांदालागवड सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी लागवडीची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कसमादेतील ४५ हजार शेतमजुरांना अच्छे दिन आले असून, कसमादेमधील अनेक खेडी आता ओस पडू लागली आहेत. 

मजुरांना रोज काम

मालेगाव तालुक्यासह कसमादेत या वर्षी पावसाने जवळपास सरासरीची डबल सेंच्युरी मारली. मालेगावमध्ये ८८६ मिलिमीटर, नांदगाव ८२८, बागलाण ८५९, देवळा ६७१, कळवण ६७०, चांदवडमध्ये ७३० मिलिमीटर पाऊस झाला. दीडशे ते दोनशे टक्के पाऊस झाल्याने खरिपाचे पीक जोरात आले. काही ठिकाणी वादळी वारे व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. शेतशिवार फुलल्यामुळे मजुरांना रोज काम मिळत आहे. सध्या बाजरी व मका कापणी, तसेच काढणीचे काम सुरू आहे. मजुरांची चणचण भासत आहे. अनेक मजूर मका कापणीसाठी रोजंदारीवर काम करण्यास धजावत नाहीत. मका कापणीचा मक्ता पद्धतीने एकरी सात हजार रुपये दर आहे. बाजरी व मका कापणीनंतर चाऱ्याच्या सरी रचण्यासाठी मजुरांची शोधाशोध करावी लागत आहे. शेतीकामे वाढल्याने मजुरीचे दरही वधारले आहेत. मका कापणीसाठी महिलांना ३००, तर पुरुषांना ५०० रुपयांपर्यंत रोज दिला जात आहे. 
मुबलक पाण्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी रब्बीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. परिणामी, शेतमजुरांना एप्रिलअखेरपर्यंत मुबलक काम मिळणार आहे. 


मजूर झाला हायटेक 

कसमादे पट्ट्यात शेतमजूर हायटेक झाला आहे. मजुरांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करावी लागत आहे. त्यातच आठवडे बाजाराच्या दिवशी दुपारी दोनपर्यंतच मजूर कामावर येतात. ने-आण करण्याची सुविधा नसली, तर मजूर कामावर जाण्यास धजावत नाहीत. दुचाकीवरून येणाऱ्या मजुरांना पेट्रोलसाठी पैसे द्यावे लागतात. कसमादे पट्ट्यात कुशल कामगारांची संख्या खूप आहे. डाळिंबावरील १५ हजारांवर कुशल कामगार परराज्यात कामाला जातात. त्यामुळे फळ पिकांसाठी मजुरांना जादा रोजंदारी देणे भाग पडत आहे. सध्या शाळा बंद असल्याने शेतीकामासाठी मुलांची मदतही घेतली जात आहे. 

 
सध्या शेतात सुरू असलेली कामे 

* बाजरी कापणे व काढणे 
* मका कापणे व चाऱ्याची सरी रचणे 
* कांदालागवड करणे 
* भुईमुगाची काढणी 
* कपाशी वेचणे 
* डाळिंबाची काढणी 
* भाजीपाल्याची तोडणी 
* रब्बी पिकासाठी शेत तयार करणे 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

BAN vs PAK : यांना चौकारही अडवता येत नाही... पाकिस्तानी चेंडूसकट सीमारेषेबाहेर... धाडकन आपटला, हॉस्पिटलमध्ये पोहोचला...

पोलीस आयुक्तांच्या पत्नीच्या पायाला काटा रुतला, डॉक्टर दारू पिऊन उपचारासाठी पोहोचला; नंतर जे घडलं त्यानं...

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचे नाव बदला! माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी

SCROLL FOR NEXT