Agriculture Department esakal
नाशिक

Nashik News: बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कृषी विभाग आक्रमक

कृषी निविष्ठा तक्रारींबाबत संपर्क करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बोगस बियाणे, खते यांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करणारा कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याच अनुषंगाने जिल्हा कृषी विभागाने आता बोगस खते व कृषी निविष्ठा विक्री होऊ नये, या साठी कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी तत्काळ तक्रारींची दखल घेण्यासाठी मोबाईल नंबर जाहीर केला आहे.

तसेच तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर जाहीर केले असून यावर तक्रारी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले आहे. (Agriculture department aggressive against sale of bogus seeds fertilizers Nashik News)

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून निविष्ठा खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना सील अथवा मोहोरबंद पाकिटे/पिशव्या/बाटल्या असल्याची खात्री करावी.

बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. शेतकरी बांधवांनी परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच व पक्क्या पावतीवरच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात. तसेच अनुदानित रासायनिक खताची खरेदी ही e-POS मशिनद्वारेच करावी.

कमी वजनाच्या निविष्ठा व पाकिटावरची छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री करणे तसेच मागणी व्यतिरिक्त इतर निविष्ठांची शेतकऱ्यांना सक्ती करणे हे बेकायदेशीर असून याबाबत कृषी विभागाकडे तसेच वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक ७८२१०३२४०८ यावर तसेच जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार, योग्य किमतीत व वेळेत कृषी निविष्ठा मिळण्याकरिता व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागस्तरावर एक जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १५ अशी १७ भरारी पथके कार्यरत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुणवत्ता निरीक्षकामार्फत तसेच भरारी पथकामार्फत आज अखेरपर्यंत खते १६०९, बियाणे १५९३ व कीटकनाशके ९८० असे एकूण ४ हजार १८२ विक्री केंद्रांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.

परवान्यात त्रुटी आढळून आलेल्या खते २७, कीटकनाशकांच्या ९ असे एकूण ३६ परवान्यावर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच बियाणे, खते व कीटकनाशक कायद्यातील तरतुदीचे उल्लंघनाच्या अनुषंगाने आजपावेतो बियाणाचे१७५, खते ६५ व कीटकनाशके ९ असे एकूण २४९ विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत.

तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने बियाण्याचे ५६१, खते २६० व कीटकनाशकांचे ८७ नमुने काढण्यात आले असून पैकी विश्लेषण अहवाल प्राप्त झालेनुसार खतांचे १३ बियाण्याचे ११ व कीटकनाशकांचे ३ नमुने अप्रमाणीत आढळून आले आहे.

सदर अप्रमाणीत नमुन्याबाबत उत्पादक कंपनी व विक्रेते यांचेवर कायद्याअंतर्गत पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच राज्यात विनापरवाना कांदा बियाणे उत्पादन व विक्री केल्यामुळे अभिजित सीड्स प्रा. लि. या कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून ४४२.५ किलो कांदा बियाणे जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT