dada bhuse pray god hanuman.jpg 
नाशिक

कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कृषीमंत्री दादा भुसे यींनी मोसमपुल चौकातील शिवसेना संपर्क कार्यालया समोरील हनुमान मंदिरात तब्बल तीन तासाहून अधिक वेळ ठिय्या मांडला. काहीवेळ पुजा केली. या दरम्यान भुसे उपोषणाला बसल्याची वार्ता सर्वदूर पसरली.  पण अशी कोणती चिंता त्यांना सतावत होती..की थेट त्यांना मारूतीरायाकडे जाऊन साकडे घालावेसे वाटले.

कृषीमंत्री दादा भुसे यांचे आत्मक्लेष व मौनव्रत

देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. रूग्णसंख्या पाचशे दहावर गेली. मानव जातीवरील हे संकट दूर होवू दे असे साकडे संकटमोचक हनुमानाला घालतांनाच मालेगाववर होणारी टीका व प्रशासकिय अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त करीत कृषीमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता.9)  आत्मक्लेष व मौनव्रत पाळले. मोसमपुल चौकातील शिवसेना संपर्क कार्यालया समोरील हनुमान मंदिरात तब्बल तीन तासाहून अधिक वेळ ठिय्या मांडला. काहीवेळ पुजा केली. या दरम्यान श्री. भुसे उपोषणाला बसल्याची वार्ता सर्वदूर पसरली. अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, आयुक्त त्र्यंबक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनां बाबत यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अधिकारींनी बैठकांबरोबर उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या दरम्यान जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी त्यांची दूरध्वनीवर चर्चा झाली. प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू होती.

"काही जण मालेगावला नाव ठेवताहेत त्याची खंत"
सकाळशी बोलतांना त्यांनी देशावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी पुजा केली. काही जण मालेगावला नाव ठेवताहेत त्याची खंत वाटते. मारूती राया सर्वांवरील संकट दूर करील या भावनेतून मी पुजा केली. मंदिरात शांत बसलो. अधिकारीची  भुसे यांच्याशी काय चर्चा झाली याचा तपशिल समजू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Incredible Innovation : इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कशिवाय दाखवणार हवामान! १२ वीच्या विद्यार्थ्याचा चमत्कार, हिमालयातील खेड्यांसाठी बनवले 'लाईफ सेव्हर' यंत्र!

जटायूचा पंख कापल्यावर रावण त्याचं नख तोडून स्वतःकडे का ठेवतो? जटायूच्या नखात असं काय होतं? नेटकऱ्यांनी सांगितलं कारण

Latest Marathi News Live Update: पेनटाकळीच्या पाण्यावरून राजकीय संघर्ष पेटला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Nvidia Stock Crash : ३० मिनिटांत गमावले ६२,००० कोटी! 'त्या' चिनी तरुणीच्या जाळ्यात अडकले जगातील दिग्गज CEO?

India Unemployment Rate: देशातील बेरोजगारीचा दर 5.4 टक्क्यांवरून 5.1 टक्क्यांवर; ग्रामीण भागात घट, तर शहरांमध्ये वाढ

SCROLL FOR NEXT