Agriculture Minister interacts with farmers on the streets nashik marathi news 
नाशिक

कृषीमंत्र्यांचा रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याशी संवाद; केली उपक्रमाची स्तुती

मुकूंद भडंगे

नाशिक : (कोकणगाव) कृषीमंत्री दादा भुसे हे मालेगावकडून नाशिकला जात असतांना कोकणगाव येथे महामार्गावर शेतकरी ताजा भाजीपाला विकतांना दिसताच गाडी थांबून शेतकऱ्याची व्यथा ऐकण्यासाठी धावले. काय म्हणाले कृषीमंत्री, वाचा सविस्तर

उपक्रमाची केली प्रशंसा

गुरूवारी (ता. 4) नाशिक येथे जात असतांना, कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोकणगाव (ता.निफाड) येथील स्थानिक शेतकरी बंधु तथा वारकरी सांप्रदायिक लक्ष्मण मोरे हे महामार्ग शेजारी छत्रीच्या सानिध्यात 'शेतकरी ते ग्राहक' या पद्धतीचा थेट अवलंब करून ताजा भाजीपाला विक्री करतांना पाहिले. यावेळी मंत्रीमहोदयांनी काही क्षण थांबून त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्याशी मोकळेपणे संवाद साधला. यावेळी शेती मालाची कोरोनाच्या महामारीत झालेली परवड व पिकलेला शेतीमाल विकण्यासाठी होणारे हाल मिळणारा बाजारभाव या विषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या या उपक्रमाची त्यांनी प्रशंसाही केली.

आत्मनिर्भर झाल्यास शेती व्यवसायालाही चांगले दिवस

शेतकऱ्यांनी कोरोना काळात थेट ग्राहक गाठून आडत्यांना डच्चू दिला आहे. पुढील काळातही शेतकरी असा आत्मनिर्भर झाल्यास शेती व्यवसायालाही चांगले दिवस येतील. मोठया प्रमाणात माल पिकवणाराने बाजारपेठेत वर्चस्व दाखवावे. श्री लक्ष्मण मोरे हे त्यांच्या शेतातील स्वतः उत्पादित केलेला ताजा भाजीपाला ग्राहकांसाठी दैनंदिन उपलब्ध करून देतात. यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर ताजा भाजीपाला मिळत असल्याने स्थानिकांना याचा निश्चितच फायदा होत आहे.

ताजा व स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची पिळवणूक थांबली व्यापाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आली. - लक्ष्मण मोरे, शेतकरी

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT