Grapes  esakal
नाशिक

Agriculture News : थंडीच्या लपाछपीमुळे रब्बीसह फळ पिकांवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यासह कसमादे परिसरात महिन्यापासून थंडीचा लपंडाव सुरु आहे. थंडीच्या लपाछपीच्या खेळाचा परिणाम गहू, हरभरा या खरीप पिकांसह फळपिकांवर होत आहे. डाळींबातील हस्त बहारावर याचा विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला आहे. कांद्यावर करपा तर द्राक्षांवर डावणी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.


तालुक्यासह कसमादेत दिवाळीनंतर थंडीने जोर धरला होता. नंतरच्या काळात पुन्हा थंडी ओसरली. पंधरा दिवसापासून थंडीचा तडाखा वाढला होता. त्यामुळे गहू, हरभरा ही पिके जोमात होती. डाळींबासह इतर फळपिकांना चांगले वातावरण होते. गेल्या चार दिवसापासून थंडी ओसरली आहे. ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे जवळपास थंडी बेपत्ता झाली आहे. कसमादेत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये धरण्यात आलेला हस्त बहाराचा डाळिंब मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या पीक फुलोऱ्यावर आहे. ढगाळ वातावरणामुळे फुलगळती होत आहे. या वातावरणामुळे रोग किडीचे व फुलकिडीचे प्रमाणही वाढले आहे. बदललेल्या वातावरणामुळे डाळिंब उत्पादक चिंतेत आहेत.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
कसमादे भागात गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील उन्हाळी कांदा लागवड जोमात सुरु आहे. अनेक ठिकाणी लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. बेपत्ता झालेली थंडी व ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. लाल कांद्याला सध्या चांगला भाव आहे. शेतकरी कांदा काढणीचे काम करीत आहेत. बेमोसमी पाऊस किंवा गारपीट झाल्यास त्याचा फटका लाल कांद्याला बसू शकतो. गहू व हरभरा या रब्बी पिकांवरही परिणाम झाला आहे. गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होवू शकतो. हरभरा पिकावर घाटेअळी वाढण्याची शक्यता आहे. कीटकनाशकांची फवारणी शेतकरी करीत आहेत. कसमादेत द्राक्ष बागांचा प्रयोगही शेतकऱ्यांनी केला आहे. द्राक्षांवर डावणी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. एकूणच थंडीच्या लपाछपीमुळे शेती पिकांवर परिणाम होत आहे.

''डाळिंब बागेत मधमाशांना आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी गुळाचे पाणी झाडावर शिंपडावे. किंवा मधमाशा थांबे तयार करावेत. डाळिंब पिकावर कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करावी. बागांना नियमित पाणीपुरवठा करावा.'' - सचिन हिरे, शास्त्रज्ञ, डाळिंब संशोधन, तंत्रज्ञान प्रसारण केंद्र, लखमापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT