onion crops esakal
नाशिक

Agriculture News : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा

वडगाव : गाव व परिसरातील सततच्या ढगाळ वातावरणामुळे वडगावसह परिसरात कांदा पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर ‘मावा’ कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

फवारणी नंतरही आठ दिवसांत पुन्हा कांद्यावर मावा येत आहे. माव्याचे कीटक कांदा पातीतील पोषणतत्त्वे शोषून घेतात त्यामुळे कांद्याची वाढ होत नाही.

कांदा पिकाला थंडी पोषक असते. या वर्षी मोठ्या प्रमाणात थंडी न पडल्याने त्याचा विपरीत परिणाम झाला. शेतकऱ्यांनी फवारणी देखील केली परंतु ढगाळ वातावरण तसेच दाट धुके यांमुळे कांदा पिके खराब झाली. यावर्षी पोषक हवामान नसल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

चालू वर्षी कांदा पिकास बाजारभाव चांगला मिळाला असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केलेली आहे. खराब हवामानाचा फटका या पिकाला बसल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी केलेला प्रचंड खर्च वसूल होईल की नाही, याबाबत शंका आहे. कांदा पीक हे शेतकऱ्याचे यावर्षी आर्थिक गणित बिघडणार की फायद्याचे ठरणार, हे सगळे बाजारभावावर ठरणार आहे.

''ढगाळ वातावरण व पहाटे पडणारे धुके यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तरी शेतकऱ्यांनी बुरशीनाशक व कीटकनाशकाची नियमितपणे फवारणी करणे आवश्यक आहे.'' - केतन शेवाळे, शेतकरी वडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

SCROLL FOR NEXT