Dr Bharati Pawar & Air Alliance Company
Dr Bharati Pawar & Air Alliance Company esakal
नाशिक

Air Alliance Company Work Stop : प्रवासी मिळूनही तोट्याचे कारण देत विमानसेवा बंद!

विक्रांत मते

नाशिक : ओझर विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीमार्फत उडान योजनेंतर्गत सुरू असलेली विमानसेवा १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आलेल्या विमानसेवेवरून नाशिकचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी अडचणीत आल्यानंतर आता विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे.

परंतु, ज्या कंपनीने विमानसेवा बंद केली त्या अलायन्स कंपनीने कमर्शिअल रेटनुसार प्रवासी मिळत नसल्याचे कारण देत सेवा बंद केल्याचे पत्र दिले. परंतु, जवळपास ८० टक्के प्रवासी मिळत असताना सेवा बंद केल्याने करण्यामागच्या कारणाला राजकारणाचा वास येवू लागला आहे. (Air Alliance Company Work Stop case Letter from Alliance Company to Minister Bharti Pawar Nashik News)

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शुक्रवारी (ता. ४) बंद झालेल्या विमानसेवा संदर्भात पत्रकार परिषद घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना नाशिकमधून इंडिगोची सेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली. केंद्र सरकारने उडेगा आम आदमी अर्थात उडान योजनेंतर्गत गर्दीच्या शहरातून मोठ्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

योजनेंतर्गत प्रवाशांमागे पन्नास टक्के भाडे केंद्र सरकार अदा करते. नाशिकच्या ओझर विमानतळावरून सुरवातीला इंडिगो, एअर अलायन्स, ट्रू- जेट, स्पाइस जेट व स्टार कंपन्यांनी विमानसेवा सुरू केली. इंडिगो, ट्रू जेट तसेच स्टार कंपनीने कालांतराने सेवा बंद केली. सध्या अलायन्स एअर कंपनीमार्फत नाशिक- पुणे, नाशिक-अहमदाबाद- दिल्ली, तर स्पाइस जेट कंपनीकडून नाशिक- हैदराबाद, नाशिक- दिल्ली तसेच नाशिक- पुद्दुचेरी व नाशिक- तिरुपती कनेक्टिंग सेवा सुरू केली होती.

अलायन्स एअर कंपनीने उडान योजनेचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने १ नोव्हेंबरपासून सेवा बंद केली. तर, ओझर विमानतळाचा रन- वे मेन्टेनन्ससाठी तेरा दिवसांसाठी बंद करण्यात आल्याने १ डिसेंबरपासून स्पाइस जेटची सेवा पुर्ववत केली जाणार आहे. परंतु नाशिकमधून विमानसेवा बंद झाल्याचे वातावरण तयार होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. पवार यांनी वस्तुस्थिती मांडली. त्या म्हणाल्या, विमानसेवेला प्रोत्साहन मिळावे म्हणून उडान योजना सुरू करण्यात आली होती.

परंतु, जानेवारीत करार संपुष्टात आला तरीही अलायन्स कंपनीने ऑक्टोबरअखेर सेवा सुरू ठेवली. परंतु उडान योजनेचा कालावधी संपुष्टात आल्याने कमर्शिअल रेट प्रवाशांना लागू करण्यात आला. परंतु, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने सेवा बंद करण्यात आल्याचे कंपनीकडून पत्र देण्यात आले. उडान योजनेचा कालावधी वाढविण्याबरोबरच नाशिकमधून इंडिगोची गोवा सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.

प्रवाशांचा प्रतिसाद तरीही सेवा बंद

या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात १०३ फ्लाइट ओझर विमानतळावर आल्या. त्यात सहा हजार २३८ प्रवासी नाशिकला आले व नाशिकहून सहा हजार ७३२ प्रवासी गेले. ऑक्टोंबर महिन्यात ७६६२ प्रवासी विमानाने आले व आठ हजार ४४५ प्रवासी विमानाने अन्य शहरात गेले. ७२ सीटरच्या विमानाचा विचार करता जवळपास ऐंशी टक्के प्रतिसाद मिळाला. उडान योजनेंतर्गत प्रतिप्रवासी पन्नास टक्के अनुदान होते. विमान कंपन्यांचे वाढीव दर व प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता कमर्शिअल रेट परवडत नसल्याचे कंपन्यांनी दिलेले कारण असमाधानकारक असल्याचे बोलले जात आहे.

"मेन्टेनन्ससाठी तेरा दिवस रन-वे बंद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर स्पाइस जेट कंपनीची सेवा सुरू राहील. अलायन्स एअर कंपनीने कमर्शिअल रेटने प्रतिसाद मिळाल्याचे कारण देत सेवा बंद केली आहे. त्यामुळे उडान योजनेचा कालावधी वाढविण्यासाठी अन्य शहरांमध्ये सेवा सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे." - डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT