Mela Bus Stand esakal
नाशिक

Devendra Fadanvis Nashik Daura : नाशिकमध्ये साकाराले वातानुकूलित बसस्थानक; फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळा बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Devendra Fadanvis Nashik Daura : राज्यातील पहिले वातानुकूलित बसस्थानक नाशिक येथे सुरू होणार असून शनिवारी (ता. १०) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळा बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

१.७३ हेक्टर जागेमध्ये वसलेल्या या बसस्थानकात ६०३३.२२ चौरस मीटर इमारतीची बांधकाम करण्यात आले आहे. ()

नागरिकांना प्रवेशासाठी स्वतंत्र द्वार असणाऱ्या या बसस्थानकात तळघरात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसस्थानकात २० फलाट असून यापैकी ४ फलाट वातानुकूलित करण्यात आलेले आहे. नाशिकमध्ये होणारे या बसस्थानकात चालक व वाहक महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रामगृह करण्यात आलेले आहे.

मातांना आपल्या लहान बाळाची काळजी घेता यावी यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष तयार करण्यात आलेला आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आलेले आहे. बसस्थानकात दिव्यागांना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेले असून अपंगांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहदेखील तयार करण्यात आलेले आहे.

बसस्थानकाचा संपूर्ण परिसर रिमिक्स ट्रिमिक्स काँक्रिट करण्यात आलेला असून, स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष महिला व पुरुषांसाठी प्रशस्त प्रसाधनगृह, नागरिकांना अल्पोपाहार करता यावा यासाठी उपाहारगृह तयार करण्यात आलेले आहे. नागरिकांना पार्सल देता यावे यासाठी स्वतंत्र पार्सल रूमदेखील तयार करण्यात आलेली असून, सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस चौकी तयार करण्यात आलेली आहे.

अत्याधुनिक बसस्थानकामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात वाढ होणार असून नाशिककर नागरिकांनी बसस्थानकाच्या लोकार्पण कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आमंत्रण आमदार देवयानी फरांदे यांनी दिलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT