Kalidas Kala Mandir
Kalidas Kala Mandir esakal
नाशिक

Nashik News: कालिदास कलामंदिरातील वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त; नवीन कूलरसह CCTV कॅमेऱ्यांचीही दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाकवी कालिदास कलामंदिरामधील वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त करण्यात आली असून, तारांगण प्रकल्पातील दोषही दूर करण्यात आले आहेत.

नाट्यगृहाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही दुरुस्ती करण्यात आली असून, खबरदारीचा भाग म्हणून वातानुकूलित यंत्रणेच्या कक्षातही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. (Air conditioning system repaired in Kalidas Kalamandir Also repair of CCTV cameras with new coolers Nashik News)

महाकवी कालिदास कलामंदिरात काही दिवसांपूर्वी प्रयोगादरम्यान वातानुकूलित यंत्रणा अचानक बंद पडून गोंधळ उडाला होता. या गोंधळानंतर प्रेक्षकांनी महापालिकेकडे प्रयोगाच्या तिकिटाचे पैसे परत मागितले.

मात्र, महापालिकेकडून नकार देण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. जवळपास ११ कोटी रुपये खर्च करून स्मार्टसिटी कंपनीच्या वतीने हे नूतनीकरण करण्यात आले.

परंतु वातानुकूलित यंत्रणा अचानक बंद पडल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशी समिती नियुक्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चौकशीअंती कालिदासचे तत्कालीन व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नाट्यगृह, सभागृह तारांगण व फाळके स्मारक विभागांची जबाबदारी विद्युत विभागाचे उपअभियंता संजय कुलकर्णी व कनिष्ठ अभियंता सुधाकर झाडे, सहाय्यक कनिष्ठ अभियंता धनंजय करके यांच्याकडे देण्यात आली आहे.

त्यानंतर कालिदासमधील वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त करण्यात आली आहे. वातानुकूलित यंत्रणेतील कॉम्प्रेसर आणि कॉइलसह अन्य दुरुस्ती करण्यात आली आहे. नवीन कूलरही बसविण्यात आले आहे. कालिदास कलामंदिराच्या आवारात बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

वातानुकूलित यंत्रणेच्या कक्षातही खबरदारीचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाशेजारी असलेल्या (स्व.) यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरमधील वातानुकूलित यंत्रणेतही बिघाड झाला होता. विद्युत विभागाने दुरुस्ती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT