Special public prosecutor misar
Special public prosecutor misar  Google
नाशिक

वाझे प्रकरणात सरकारची बाजू सांभाळणार नाशिकचे अजय मिसर

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : सचिन वाझे प्रकरणात (Sachin waze case) पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याचा आरोप होत असताना, या फोन टॅपिंगचा अहवाल लीक केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल कला आहे. आता या प्रकरणात मुंबई हाय कोर्टासह मुंबई सेशन कोर्टात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी राज्य सरकारने (State Government) विशेष सरकारी वकील म्हणून नाशिकचे अॅड. अजय मिसर (Special public prosecutor misar) यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. (ajay misar special public prosecutor Nashik Appointed on Waze Case by State government)

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या वसुली आरोपांबाबत निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेची मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यातील गोपनीय संभाषण अहवाल लीक झाल्याने खळबळ उडाली आहे.

अॅड. मिसर यांनी यापूर्वी सीबीआयकडील गुंतागुंतीच्या खटल्यांचे कामकाज पाहिले आहे. तसेच 2008 मध्ये झालेला मालेगाव बॉंब स्फोट, छोटा शकिल, पाकमोडिया स्ट्रीट कासकरचा मोक्का खटला, लष्कर-ए-तैयबा विरोधातील खटले, अबू जिंदाल, हिमायत बेग, शेख लाल बाबा या आतंकवाद्यांविरोधात खटल्यांमध्ये सरकारची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे.

(ajay misar special public prosecutor Nashik Appointed on Waze Case by State government)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT