नाशिक : महाराष्ट्रात अनेक रिक्त जागा भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जलसंपदा, महसूल, सार्वजनिक आरोग्य विभागात 60 ते 70 हजार जागांची भरती करणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील कादवा इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी वरखेडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाला हजेरी लावली. मुलं-मुली या वयात अनेक प्रलोभनांच्या आहारी जातात. मात्र आम्ही कौशल्य विकासाचा कार्यक्रम हातात घेतला आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं.
बळीराजाला दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय
बळीराजाला दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दरवर्षी कर्ज फेडणाऱ्यांना काही ना काही देण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे, अशी माहितीही अजित पवारांनी दिली. सरकारमध्ये आल्यानंतर शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन थाळी यासारख्या योजना सुरु केल्या. या योजनेत जर काही त्रुटी राहिल्या तर लक्षात आणून द्या, सुधारणा करु, असे देखील अजित पवार म्हणाले.
हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.