Mango from Karnataka. In the second photo, vendors selling mangoes in the market  esakal
नाशिक

Akshay Tritiya 2023 : कर्नाटक, तेलंगणा, आंध्रचा आंबा बाजारात; परराज्यातील कैरी देखील व्रिकीला!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अक्षयतृतीया सण अवघ्या सहा दिवसावर आलेले आहे. या सणासाठी येथील फळ बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. अक्षयतृतीयेला (Akshay Tritiya 2023) आमरसासाठी मालेगावसह कसमादेवासियांना यावर्षी परराज्यातील आंब्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. (Akshaya Tritiya 2023 mango traders imported from states like Karnataka Telangana Andhra Pradesh nashik news)

अक्षयतृतीयासाठी कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यातून आंबा येथील व्यापाऱ्यांनी आयात केला आहे. कोकणातील आंबा जरी बाजारात दाखल झाला असला तरी तो सध्यातरी सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

सणाच्या पाश्‍र्वभूमीवर घाऊक व्यापाऱ्यांनी शेकडो टन केशर, लालबाग, बदाम आदी प्रकारच्या आंब्याची बुकिंग केली होती.आता बुकिंगनुसार आंबा घाऊक विक्रेत्यांच्या गोदामात साठविला जात आहे. दोन दिवसानंतर बाजारात आंब्यांची आवक वाढणार आहे.

कसमादे पट्ट्यात अक्षयतृतीयेपासून प्रामुख्याने आंबे खाण्यास सुरुवात होते. या दिवशी पूर्वजांना आमरसाची आगारी टाकली जाते. यानंतर खऱ्या अर्थाने आंबे खाल्ले जातात. या सणानिमित्त आंबे कितीही महागले तरी या दिवशी आम रसाचीच आगारी टाकली जाते. शेकडो वर्षाची ही परंपरा आजही जोपासली जात आहे.

सणाच्या पार्श्वभूमीवर घाऊक विक्रेत्यांनी आंब्यांचे नियोजन केले आहे. राज्यात कोकणचा आंबा बाजारात येत आहे. मात्र दर अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे विशेष करून येथील व्यापाऱ्यांनी कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या तीन राज्यातून प्रामुख्याने आंबे विक्रीस आणले आहे. त्यासाठी घाऊक विक्रेत्यांनी मोठी गोदामे उभारली आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

आंब्यांचे भाव यावर्षी वाढलेले आहेत. सध्या घाऊक बाजारात केशर ९० ते १००, लालबाग ७० ते ८० व बदाम ७० ते ७५ रुपये किलो आहे. कसमादे परिसरात होत असलेला बेमोसमी पाऊस, वादळी वारे व गारपिटीचा फटका आंबा पिकाला बसला आहे.

मुळातच या भागात आंब्याचे उत्पन्न कमी होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यावर्षी गावठी आंबा जेमतेमच येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षापासून लोणच्यासाठी विक्रेते गुजरातहून कैरी आणून या भागात विकतात. यावर्षी देखील हीच परिस्थिती राहू शकेल.

अक्षयतृतीया सणासाठी कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश येथून आंब्याचा माल येत आहे. वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कसमादे परिसरातील आंब्याचे उत्पन्न जेमतेमच राहील. आंब्याबरोबरच कैरीची देखील परराज्यातून आवक राहील. मे च्या सुरवातीपासून आंब्याचे दर कमी होण्याची शक्यता राहिल. - आर. एस. बागवान संचालक, रोशनी सितारा फ्रुटस्‌, चांदवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT