bayjabai 1.png
bayjabai 1.png 
नाशिक

पतीची आज्ञा अन् बायजाबाईंवर आलेला काळाचा घाला! कुटुंबियांचा आक्रोश

हिरामण चौधरी

नाशिक / सुरगाणा : दुपारी दोनच्या सुमारास पावसाचा अंदाज आल्याने पतीने बायजाबाई यांना घरी जाण्यास सांगितले. घरी परतत असताना वाटेतच विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळीच त्यांच्यावर काळाचा घाला आला की कुटुंबियांचा आक्रोश थांबता थांबेना..काय घडले?

पतीची आज्ञा अन् बायजाबाईंवर आलेला काळाचा घाला!

सुरगाणा तालुक्यातील आळीपाडा येथील बायजाबाई मधुकर जोपळे (वय ४७) यांच्यासमवेत शेतात भात निंदणीचे काम करीत होत्या. दुपारी दोनच्या सुमारास पावसाचा अंदाज आल्याने पतीने बायजाबाई यांना घरी जाण्यास सांगितले. घरी परतत असताना वाटेतच विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ग्रामस्थांनी बायजाबाईंना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले असून, तलाठी विनोद गांगुर्डे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नैसर्गिक आपत्ती कक्षात नोंद झाली असून, वरिष्ठ कार्यालयास कळविल्याचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. या आकस्मिक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नातेवाइकांना दिला धीर

तालुक्यातील आळीपाडा येथील बायजाबाई मधुकर जोपळे (वय ४७) यांच्या अंगावर वीज पडून त्या ठार झाल्याची घटना घडली. बायजाबाई यांच्यामागे पती, मुले, मुली असा परिवार आहे. प्रतापगड ग्रामपंचायतीचे सदस्य काशीनाथ दळवी, सुभाष देशमुख, रामदास दळवी आदींनी नातेवाइकांना धीर दिला.  

संपादन - ज्योती देवरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT