India Student Federation's agitation 
नाशिक

शाळा, महाविद्यालय शुल्‍कमाफीसाठी AISF चे ठिय्या आंदोलन

अरुण मलानी

नाशिक : कोरोना काळातील शाळा, महाविद्यालयांची संपूर्ण शुल्‍कमाफी करावी, या मागणीसाठी ऑल इंडिया स्‍टुडंट फेडरेशनतर्फे (AISF) मंगळवारी (ता. २७) जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करीत सहभागी विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. आंदोलक विद्यार्थ्यांनी मागण्यांसंदर्भात सविस्‍तर निवेदन जिल्‍हा प्रशासनाला दिले. (All India Student Federation's agitation for college fee waiver)

कोरोना काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शुल्‍कमाफीसाठी एआयएसएफच्या आंदोलनानंतर, तसेच विद्यार्थी व पालक संघटनांच्या रेट्याने पारंपरिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसंदर्भात शिफारशी करण्यासाठी राज्‍य शासनाने समिती नेमली आहे. या समितीसमोर एआयएसएफ संपूर्ण शुल्कमाफीचा आग्रह धरणार आहे. हा निर्णय लवकर व्हावा याकरिता आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढविण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी आणि पालकांची आंदोलने सुरू आहेत.

लॉकडाउन काळात शाळा व महाविद्यालय पूर्णतः बंद असल्याने कोणत्याही पायाभूत सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. त्यामुळे संपूर्ण शुल्‍क वसूल करण्याचे संस्थाचालकांचे धोरण बेकायदा आहे. राज्‍य शासनातर्फे गठित समितीत पालक, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व नाही. समितीच्या कार्यकक्षा स्पष्ट नाहीत. समितीने विविध घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळापत्रक व कार्यपद्धती निश्चित केलेली नाही. समितीने विद्यार्थी, पालकांचे म्हणणे ऐकण्यासाठी नाशिक विभागात जनसुनवाईचा कार्यक्रम तत्काळ जाहीर करावा, अशी मागणी आहे. बुधवार (ता. २८)पासून मागणी मान्‍य होईपर्यंत एआयएसएफतर्फे बेमुदत साखळी उपोषण केले जाणार आहे. या वेळी एआयएसएफ राज्‍याध्यक्ष विराज देवांग, जिल्‍हाध्यक्ष अविनाश दोंदे यांच्‍यासमवेत जिल्‍हा सचिव अक्षय दोंदे, जयंत विजयपुष्प, गायत्री मोगल, कैवल्य चंद्रात्रे, प्रणाली मगर, सागर जाधव, प्राजक्ता कापडणे, कैफ शेख, प्रज्वल खैरनार, शरद खाडे आदी सहभागी झाले होते.

अशा आहेत मागण्या

कोरोना काळातील शुल्कमाफीसाठी विद्यार्थी केंद्र शिफारशी करण्यासाठी जनसुनावणीचा कार्यक्रम नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात निश्चित करावा. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ७० टक्के शुल्क माफ करावे. उर्वरित ३० टक्के शुल्काची जबाबदारी राज्य, केंद्र शासनाने उचलावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला त्वरित अदा करावा. अतिवृष्टीग्रस्त विभागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क, इतर शैक्षणिक शुल्क माफ करावे. थकीत शिष्यवृत्ती रक्‍कम त्वरित मिळावी.

(All India Student Federation's agitation for college fee waiver)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT