Nashik Police Commissionerate esakal
नाशिक

Nashik Police: शहर पोलिसांचे ‘ऑलआऊट’ ऑपरेशन! आयुक्तालय हद्दीत 50 ठिकाणी नाकाबंदी

नववर्षाच्या स्वागताची जल्लोषात तयारी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर आयुक्तालय हद्दीत पोलिसांनी ऑलऑऊट ऑपरेशन राबवून टवाळखोरांसह तळीरामांची धरपकड केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नववर्षाच्या स्वागताची जल्लोषात तयारी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर आयुक्तालय हद्दीत पोलिसांनी ऑलऑऊट ऑपरेशन राबवून टवाळखोरांसह तळीरामांची धरपकड केली.

ऑलऑऊट ऑपरेशन रविवारीही (ता.३१) राबविले जाणार असून, शनिवारी, रविवारी शहर हद्दीमध्ये सुमारे ५० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. (All Out Operation of nashik City Police Blockade at 50 places in Commissionerate limits)

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नाशिककर जसे सज्ज झाले आहेत, त्याचप्रमाणे या जल्लोषात कोणत्याही अनुचित प्रकाराने विघ्न न येण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहेत.

यानुसार, शनिवारी (ता.३०) रात्री ८ वाजेपासून सोमवारी (ता.१) पहाटे ६ वाजेपर्यंत पोलिसांकडून आयुक्तालय हद्दीत नाकाबंदीचे नियोजन केले आहे.

त्यानुसार, शनिवारी (ता.३०) मध्यरात्रीपर्यंत आयुक्तालय हददीमध्ये नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करण्यात आली. तर, पोलीस ठाणेनिहाय ऑलआऊट ऑपरेशन राबवून टवाळखोर, तळीरामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स, बार, परमीट रुमची पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून तपासणी सुरू करण्यता आली आहे. सोसायट्यांसह खासगी जागेत विनापरवानगी मद्यपार्टी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

शनिवारी (ता. ३०) संकष्टी चतुर्थी असल्याने जल्लोषावर काहीचा परिमाम जाणवला असला तरी, उद्या, रविवारी (ता. ३१) सुटी आल्याने सकाळपासूनच पर्यटनस्थळांसह रिसॉर्ट, फार्म हाउस, हॉटेल्स व परमिट बारमध्ये जल्लोषाला रंग चढणार आहे.

१ जानेवारीच्या पहाटे पाचपर्यंत रिसॉर्ट, फार्महाऊस, हॉटेल्स, बारमधील पार्ट्यांना परवानगीअसली तरी त्यासाठी आगाऊ परवानगी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी

- आडगाव, पंचवटी, म्हसरूळ - १४

- मुंबई नाका, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर - १६

- इंदिरानगर, अंबड, सातपूर - ११

- उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प - ९

असा आहे बंदोबस्त

शहर आयुक्तालय : उपायुक्त - ४, सहायक आयुक्त - ७, पोलिस निरीक्षक - ३०, उपनिरीक्षक -१५०, कर्मचारी - २००, होमगार्ड - १५०

ग्रामीण पोलिस : अपर पोलिस अधीक्षक -२ , उपविभागीय अधिकारी - ८, पोलिस निरीक्षक - ४०, उपनिरीक्षक - २००, पोलिस कर्मचारी - १५००, होमगार्ड - १५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT