PPE kit for police.jpg 
नाशिक

पोलिसांबद्दल 'त्यांची' कृतज्ञता कौतुकास्पद...'सुरक्षाकवच'ची दिली भेट!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना संशयितांना तपासणीसाठी जाणाऱ्या विशेष आरोग्य पथकासोबतच्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यापासून या पथकातील पोलिसांना सुरक्षितता मिळावी, यासाठी सातपूर येथील एलपीएस सर्व्हिसेस या कंपनीमार्फत स्पेशल प्रोटेक्‍शन (पीपीई) किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

एलपीएस सर्व्हिसेसकडून पीपीई किट 

नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील एलपीएस सर्व्हिसेस कंपनीचे संचालक ऍड. नीलेश व संदीप वाघ यांनी पोलिस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला किट दिले आहे. या वेळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहाय्यक निरीक्षक श्रीराम पवार यांच्या हस्ते 31 पीपीई किट्‌स पथकातील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यभरात लॉकडाउन सुरू आहे. तर अनेक नागरिक परदेशातून, राज्य व परजिल्ह्यातून आल्यानंतर प्रशासनास काहीही माहिती न देता राहात आहेत. मात्र अशा नागरिकांचा शोध पोलिसांना घ्यावा लागतो आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील संशयितांचा शोध आरोग्य विभागासमवेत पोलिसांच्या पथकालाही करावा लागत आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षणही आरोग्यसेविकांसह पोलिसांना करावे लागते. 

आतापर्यंत मास्क, हॅन्डग्लोज, तसेच इतर साधनांचा वापर करून हे काम केले जात होते. परंतु आता पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या सूचनेनुसार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सातपूर येथील एलपीएस सर्व्हिसेस या कंपनीने प्रतिसाद देत पीपीई कीट उपलब्ध करून दिले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT