damage road  esakal
नाशिक

Nashik News: मुदत संपली, तरी रस्ते खोदाई सुरूच...; स्मार्टसिटीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊन अपघाताची शक्यता लक्षात घेता महापालिकेने ११ मेनंतर रस्ता खोदल्यास गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी ३० मेची मुदत देण्यात आली होती.

दोन्ही मुदत संपुष्टात येत असताना रस्त्यांची खोदाई तर सुरू आहेच, मात्र त्या व्यतिरिक्त खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्तीदेखील केली जात नसल्याने स्मार्टसिटीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Although deadline expired road digging continues Governance of Smart City once again in discussion Nashik News)

महापालिका हद्दीमध्ये सध्या स्मार्टसिटी कंपनी व महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. त्याचबरोबर बीएसएनएल व अन्य मोबाईल कंपन्यांकडूनदेखील ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई सुरू आहे.

मागील दोन ते अडीच वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डे खोदले जात असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक नुकसानदेखील होत असल्याने रस्ते खोदाई बंद करा, अशी सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.

नागरिकांचा त्रास लक्षात घेता महापालिकेने ११ मे रस्ते खोदण्यासाठी अंतिम मुदत दिली होती, तर ३० मेस खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. परंतु दोन्ही मुदत संपत असताना रस्त्यांवरील खोदाईचा सुरू आहेस.

परंतु जे रस्ते खोदले आहेत, त्याचीदेखील दुरुस्ती होत नसल्याची बाब समोर आले आहे. स्मार्टसिटी कंपनीकडून महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्याची तयारी महापालिकेतून करण्यात आली असून, महापालिकेवर स्मार्टसिटी कंपनी भारी पडल्याचे यातून दिसून येते.

गावठाण भागातील कामांची संयुक्त पाहणी

स्मार्टसिटी कंपनीकडून शालिमार व शिवाजी रोड भागात चांगले रस्ते खोदण्यास सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान, काही राजकीय पक्षांच्या आंदोलनामुळे काम बंद करण्यात आले होते.

रस्त्यांची परिस्थिती पाहण्यासाठी महापालिका व स्मार्टसिटी अधिकाऱ्यांमार्फत संयुक्त पाहणी केली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council decision : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोदी सरकारकडून 'GOOD NEWS' ; दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

No GST on Insurance: आरोग्य व जीवन विम्यावर शून्य GST; तुमच्या पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार?

GST tax slabs : 'जीएसटी' बैठकीत मोठा निर्णय ; आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार

Uday Samant: लंडनमध्ये ‘मराठी भाषा केंद्र’! महाराष्ट्र मंडळाची इमारत ताब्यात घेणार

Video : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अग्नितांडव, १० ते १२ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT