ambulnace in village.jpg 
नाशिक

रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

रोशन खैरनार

सटाणा (नाशिक) : मेलेल्या माणसाच्या टाळुवरील लोणी खाणे,ही म्हण तंतोतंत जुळणारी ही घटना..अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना चालकानेच संधी साधली. या धक्कादायक प्रकाराने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी
१६ ऑक्टोबर २०२० ला कळवाडी (ता.मालेगाव) येथील कैलास खवळे नवरात्रोत्सवानिमित्त नामपूर रस्त्याकडून सप्तशृंगगडाकडे मशाल घेऊन जात असताना येथील बागलाण ॲकॅडमीजवळ त्यांचा अपघात झाला. खवळे यांना खासगी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात रवाना केले होते. याचदरम्यान जखमी खवळे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी गायब झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांचे बंधू जितेंद्र खवळे यांनी सटाणा पोलिसांत याबाबत फिर्याद दिली होती. सटाणा पोलिसांना रुग्णवाहिकाचालक कल्पेश निकम याच्यावर संशय असल्याने त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या देहबोलीवरून पोलिसांचा संशय वाढल्याने पोलिसी खाक्या दाखवताच निकम याने सोनसाखळी काढल्याचे कबूल केले. ही साखळी त्याने ६३ हजारांना विक्री केल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले.  

रुग्णवाहिकाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना चालकानेच जखमी रुग्णाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची घटना सटाणा शहरात उघडकीस आली. सटाणा पोलिसांनी संशयित रुग्णवाहिकाचालक कल्पेश निकम याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: मराठा आरक्षण मूळ ओबीसींच आरक्षण कसं खाणार...? पुढच्या १० वर्षात भीषण परिस्थिती, अभ्यासक काय म्हणतात?

Latest Marathi News Updates : - घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

मनपा निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का! प्रकाश महाजन यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', कारण काय?

Aurangzeb Poster Incident : औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक; अकोल्यात तणावाचं वातावरण, आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग, २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू, नवरात्रोत्सवाआधी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT