District President Arjun Borade, Taluka President Ramakrishna Bomble Bhanudas Dhikle etc. while giving a statement to the District Collectors to amend the proposed Agriculture Act. esakal
नाशिक

Nashik News: शेतीच्या प्रस्तावित कायद्यात सुधारणा करा; शेतकरी संघटनेची राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

सकाळ वृत्तसेवा

कसबे सुकेणे : शेतकऱ्यांना विकलेल्या कृषीनिविष्ठा निकृष्ट दर्जाच्या निघाल्यास शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी राज्य शासनाने प्रस्तावित केलेले कायदे मागे घ्यावेत, यासाठी काही संघटनांकडून शासनावर दबाव टाकत आहेत.

सरकारने या दबावाला बळी न पडता प्रस्तावित शेती कायद्यात सुधारणा करून कायदे अमंलात आणावेत, अशी मागणी (कै.) शरद जोशी प्रणित जिल्हा शेतकरी संघटनेने केली आहे. (Amend Proposed Agriculture Act Farmers organizations demand to state government through statement Nashik News)

याबाबत मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खते, बियाणे किंवा कीटकनाशके निकृष्ट, कमी प्रत, बनावट किंवा पिकांना नुकसानकारक असतील.

त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले, तरी त्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असणारा कोणताही कायदा सध्या अस्तित्वात नाही. राज्य शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर वचक असावा व त्यांना कठोर शासन व्हावे, यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी व फसवणूक झाल्यास नुकसानभरपाई मिळण्यासाठी अशा कायद्यांची गरज आहे. कृषीनिविष्ठाच्या कायद्याबद्दल कृषी सेवा केंद्र मालक, वितरक, उत्पादक कंपन्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत व त्यामुळे त्यांच्याकडून व इतर काही संघटनांकडून कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

ही अशी मागणी शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहे व गैरप्रकार करणाऱ्यांना पाठीशी घालणारी आहे. राज्य शासनाने कायदे संमत करण्याअगोदर बियाणे, कीटकनाशक कंपन्या, वितरक, कृषी सेवा केंद्र चालक संघटना व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणीही केली आहे.

खते, बियाणे, कीटकनाशकांबरोबर पीसीआर (संप्रेरके) व तणनाशकांचा ही या कायद्यात समावेश करावा.

या बाबींमध्ये तक्रार करण्यासाठी ४८ तासांची मुदत आहे, ती वाढवून आठ दिवस करण्यात यावी, कंपनी, दुकानदार किंवा स्टॉकिस्ट यांच्याकडून हप्ते वसूल करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाईची तरतूद असावी,

अशी मागणी जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, निफाड तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोंबले, भानुदास ढिकले, लुखा बोराडे, केदू बोराडे, नामदेव बोराडे, सोपान संधान आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange News: मनोज जरांगे जुन्नरमध्ये दाखल, आंदोलनावर ठाम, अटींचे पालन करण्याचे पोलिसांना हमीपत्र, म्हणाले...

Asia Cup 2025: संजू सॅमसनची सलग 50+ धावांची खेळी, वाढवली शुभमन गिलसह गौतम गंभीरची डोकेदुखी

Flowers Price Hike: गणेशोत्सवात फुलांचा भाव वाढला! गुलाब ६०० रुपये किलो तर झेंडू...; वाचा सविस्तर

Trump Tariff: भारतावर इतर देशांच्या तुलनेत जास्त टॅरिफ का? रघुराम राजन यांनी स्पष्टच सांगितलं

Manmad News : मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेसमधील २८ वर्षांची 'धावत्या गणपती'ची परंपरा खंडित

SCROLL FOR NEXT