A dusty amphitheater. esakal
नाशिक

Nashik News : ॲम्फीथिएटर असूनही नसल्यासारखेच..! एखादा कार्यक्रम वगळता वापरच नाही

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : पंचवटी विभागातील उद्यानात आजमितीला सहा ठिकाणी ॲम्फीथिएटर उभारण्यात आलेले आहेत. एक- दोन कार्यक्रमांचा अपवाद वगळता हे उदंड ॲम्फीथिएटर धूळखात पडून आहेत.

एकट्या पंचवटीत १०५ उद्याने आहेत. त्यात अमृतवन, रामसृष्टी, थीमपार्क ही उद्याने पाच एकरापेक्षा मोठ्या जागेत विकसित करण्यात आलेली आहे. (amphitheater No use except for program at panchavati Nashik News)

गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान आणि नवीन आडगाव नाका परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातही ॲम्फीथिएटर तयार करण्यात आलेले आहे. अशा या उद्यानात शेकडोंच्या संख्येने प्रेक्षक बसू शकतील, अशी व्यवस्था आहे.

अशा मोकळ्या जागेत कार्यक्रम सादर करण्याची अद्याप कुणी फारशी तयार दर्शविली नाही. किंबहुना तसा प्रयत्न कुणाकडून होत नाही. उद्यानातील वापरात नसलेल्या ॲम्फीथिएटरची दुरवस्था झालेली दिसत आहे.

अनेक ठिकाणी या बांधकामाला तडे गेलेले आहेत. त्यांच्या मंचावरील तसेच प्रेक्षकांच्या बसण्याच्या जागेवरील फरशा तुटून, निखळून पडल्या आहेत. सध्या तपोवनातील रामसृष्टी उद्यानातील ॲम्फीथिएटरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे.

त्याच्या निखळलेल्या फरशा काढण्यात आलेल्या आहेत. तवली डोंगरावरील अमृतवन उद्यानातील ॲम्फीथिएटर ही अशीच अवस्था आहे. हिरावाडीतील थीमपार्क नुकताच खुला करण्यात आलेला असताना त्याच्याही ॲम्फीथिएटरला तडे गेलेले दिसत आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

प्रयत्न शून्य

सांस्कृतिक चळवळीला वाढण्यासाठी आणि कलाकारांना वाव देण्यासाठी या ॲम्फीथिएटरचा वापर होणे गरजेचे असताना तसा प्रयत्न कुठेही होत नसल्याचे दिसते. नाटकाच्या तालिमीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याची तक्रारी रंगकर्मींकडून सातत्याने केल्या जातात.

त्यांच्यासाठी ॲम्फीथिएटरचा चांगला पर्याय होऊ शकेल. कोरोनामुळे बंदिस्त ठिकाणी कार्यक्रम घेण्यास अडचणी निर्माण होत असताना ॲम्फीथिएटर पर्याय चांगला आहे. शिवाय पंचवटीतील मोकळ्या ठिकाणी या ॲम्फीथिएटर असल्याने तेथे छोटे कार्यक्रम घेणे शक्य आहे.

रंगकर्मी प्रथमेश जाधव याने घराच्या गच्चीवर खुला रंगमंच उभारून नाट्य प्रयोग सादरीकरण्यास वाव मिळून दिला. तर दुसरीकडे असलेले ॲम्फीथिएटर वापराविना पडून असल्याची खंतही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान, नवीन आडगाव नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, तपोवनातील रामसृष्टी उद्यान, मखलाबादच्या तवली डोंगरावरील अमृतवन उद्यान, हिरावाडी स्नेहनगरमधील थीमपार्क, रामवाडीजवळ स्मार्टसिटीअंतर्गत प्रोजेक्ट गोदा आदी ठिकाणी ॲम्फीथिएटर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT