while in the second picture, Amrasa's dinner plate.
while in the second picture, Amrasa's dinner plate. esakal
नाशिक

Nashik News : कसमादेत आमरसाच्या जेवणाला पसंती! उन्हाच्या झळांमध्ये चाखला जातोय आमरसाचा गोडवा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सध्या लग्नसमारंभ, मांडव-हळद, लग्न, वास्तुशांती, वाढदिवस, माजी विद्यार्थी मेळावा असे विविध कार्यक्रम जोरात सुरू असल्याने पर्यटनकेंद्र, मंगल कार्यालय आदीठिकाणी जेवणावळी उठत आहे.

यात खास म्हणजे आमरसाच्या जेवणाला विशेष मागणी व पसंती दिली जात असल्याने कसमादे भागात आमरसाच्या पंगतींना सुरवात झाली आहे. त्यामुळे पुरणाच्या पोळ्या (मांडे), आमरस, रसई- भात, कुरडई, भजी असे खमंग बेत होत आहे. (Amrasa food preferred in Kasmade sweetness of amrasa being tasted in heat of summer Nashik News)

सध्या आंब्यांचा सीझन चांगलाच सुरू झाल्याने सर्व प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध झाले आहेत. यावर्षी आंब्याचे भाव किमान ७० रु.ते कमाल १००-१४० रुपये पर्यंत आहेत. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा बाजारात येऊ लागला आहे.

इतर गोड जेवण वर्षभर एकसारखेच असले तरी या दिवसांत आमरसाचे जेवण खास असते. लहानमोठे साऱ्यांनाच या जेवणाचे आकर्षण असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या झळात आमरसाचा गोडवा चाखला जात आहे. शहरातल्या मंडळीला खापरावरचे मांडे आवडतात.

त्यामुळे ग्रामीण भागात आल्यावर त्यांची पहिली पसंती आमरसाचे जेवण अशीच असते. येथील काही विशिष्ट केटरर्स खास आमरसाच्या जेवणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडून घरगुती पद्धतीने बनवलेले मांडे नगावरही मिळत असल्याने त्यांना खास मागणी वाढली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मांडे बनवण्यातून नवीन उद्योगाची चाहूल

आमरसाच्या पंगतीतील खास मेनू म्हणजे खापरावरच्या पोळ्या (मांडे). हे मांडे बनवण्याचे कौशल्य काही महिलांनाच जमते. त्यामुळे या काळात अशा सुगरणींना विशेष मागणी असते. खापरावरचे मांडे तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत आहे.

गहू धुणे, वाळवणे, जात्यावर दळणे, पातळ कापडावर चालणे, यातून तयार झालेले पिठाची कणिक बनवणे, या कणकेच्या योग्य आकारमानाच्या पोळ्या लाटून त्यात शिजवलेली हरभरादाळ व गुळ एकत्र करून तयार असलेल्या पुरणाचा गोळा, हा गोळा पोळपाटावर पोळी तयार केली जाते व नंतर ही पोळी दोन्ही हाताचे मनगट व कोपरावरून कौशल्याने फिरवत मोठी झाल्यानंतर भाजण्यासाठी खापरावर टाकली जाते.

काही महिला दोन-दोन फूट व्यासाचे मांडे तयार करतात. अशी मांडे तयार करण्याचा व्यवसाय काही महिला तसेच पुरुषही करू लागली आहेत. मांडे बनवण्याचा हा अनोखा व्यवसाय करण्यासाठी काही घरगुती स्वरूपात तर काही केटरर्स व्यवसाय करणारे उतरले आहेत.

"आमच्या घरी लहानमोठे सारेच मांडे करण्याच्या कामात मदत करत असल्याने आम्ही मोठ्या कार्यक्रमातही मांडेसह आमरसचे जेवण देत असतो. या दिवसांत आमरसाच्या जेवणाला जास्त पसंती दिली जात आहे" -दिनकर भदाणे, राम केटरर्स माळवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT