Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar, Eeti Pandey, Shankar Wagh, Pankaj Khatal, Jai Phulwani etc esakal
नाशिक

Amrit Bharat Scheme: मनमाड, नगरसूल रेल्वेस्थानकात ई-भूमिपूजन! रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी मिळणार निधी

सकाळ वृत्तसेवा

Amrit Bharat Scheme : पंतप्राधन नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृत भारत योजनेंतर्गत मनमाड आणि नगरसूल रेल्वेस्थानकांचा समावेश करण्यात आल्याने रविवारी (ता. ५) या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करण्यात आले.

या योजनेंतर्गत रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार असून, प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उद्‍घाटनानंतर केले. (Amrit Bharat Scheme EBhoomi Pujan at Manmad Nagarsul Railway Station Funds for development of railway stations nashik)

प्रवाशांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात, यासाठी अमृत भारत योजनेंतर्गत देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचा २५ हजार कोटी रुपये खर्चून कायापालट होणार आहे. यात मनमाड आणि नगरसूल रेल्वेस्थानकांचा समावेश करण्यात आला.

उद्‍घाटनाप्रसंगी भुसावळ विभागाच्या प्रबंधक ईती पांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी आदी उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाल्या, की नागालँड येथे शंभर वर्षांनंतर दुसरे रेल्वेस्थानक पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून होत आहे. मनमाड, नांदगाव, नगरसूल, लासलगाव स्थानकांवर ८५ कोटी रुपये खर्चून रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार आहे.

या योजनेतून मनमाड रेल्वे स्थानकावर ४४.४४ कोटी रुपये खर्चून प्रवाशांच्या सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, देवळाली, नांदगाव, लासलगाव यांसह भुसावळ विभागातील पाचोरा, चाळीसगाव, धुळे आदी स्थानकांचा समावेश आहे.

यानिमित्त विविध शाळांमध्ये झालेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मंत्री डॉ. पवार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात दिली. विद्यार्थ्यांनी ‘जागर खंडोबाचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

नगरसूल (ता. येवला) ः येथील रेल्वेस्थानकात अमृत भारत योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी उद्‍घाटनानंतर कोनशिलेचे अनावरण करताना माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सरपंच मंदाकिनी पाटील, बाळासाहेब लोखंडे, प्रमोद पाटील आदी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नगरसूल स्थानकात कोनशिला अनावरण

नगरसूल ः येथील रेल्वेस्थानकातही रविवारी विकासकामांचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने भूमिपूजन झाले. नगरसूल रेल्वेस्थानकासाठी सुमारे वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या योजनेंतर्गत विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

येथील कार्यक्रमाला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी के. व्ही. हरिकृष्ण राव, सिकंदराबादचे उपमुख्य अभियंता वेणूगोपाळ राव, मुख्य कमर्शियल निरीक्षक धनंजयकुमार सिंह, माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सरपंच मंदाकिनी पाटील, माजी सरपंच प्रा. प्रमोद पाटील,

मंत्री भुजबळांच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख बाळासाहेब लोखंडे, माजी नगरसेवक प्रमोद सस्कर, उपविभागीय पोलिस अधीक्षक विशाल क्षीरसागर, रेल्वे सल्लागार समिती सदस्य मनोज दिवटे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, सुनील पैठणकर, विनोद पाटील, संजय कुक्कर, संजय परदेशी,

भाजप तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, नानासाहेब लहरे, मकरंद सोनवणे, बापू गाडेकर, सरपंच नाना सांगळे, सूरजसिंग राजपूत, योगेश इप्पर, जनार्दन गंडाळ, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष अनुपमा मढे,

भाऊ लहरे, संतोष गंडाळ, शौकत शेख, अनिल वरे, सरपंच कृष्णा कव्हात, रेल्वे स्टेशन अधीक्षक गौतम अहिरे आदी उपस्थित होते. रेल्वे विभागाचे अभियंता जयप्रकाश यांनी सूत्रसंचालन केले. रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी संजय कासारवार यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT