On the occasion of the Amrit Mahotsav of Independence, young men and women of the Shivtal Dhol troupe while throwing orange, white and green colors on the drum on Tuesday. esakal
नाशिक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : NMC मुख्यालयात देशभक्तीची लहर

विक्रांत मते

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महापालिकेकडून स्वराज्य महोत्सवाचे मंगळवारी (ता. ९) आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांचा गजर, एनसीसी कॅडेटने गायलेली देशभक्तिपर गीते या कार्यक्रमांमुळे महापालिका मुख्यालयाच्या आवारात देशभक्तीची लहर निर्माण झाली.

अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवताल ढोल-ताशा पथकाने आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अतिशय लयबद्ध आणि जोशपूर्ण सादरीकरण करत दाद मिळविले. (Amrit Festival of Independence Wave of Patriotism at NMC Headquarters Nashik Latest Marathi News)

दुसऱ्या छायाचित्रात जनजागृती सायकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवताना अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे

एसव्हीकेटी, एचपीटी, बीवायके महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनेही देशभक्तिपर गाणी सादर केली. महापालिकेचे उपअभियंता रवींद्र बागूल व गुणवंत वाघ यांनीदेखील देशभक्तिपर गीते सादर केले. कार्यक्रमानंतर अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सायकल रॅलीला आणि थार रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. महापालिका मुख्यालयापासून सायकल रॅलीला सुरवात झाली.

कॅनडा कॉर्नर, शरणपूर पोलिस चौकी, मायको सर्कल अशा मार्गाने पुढे गोल्फ क्लबला सायकल रॅलीचा समारोप झाला. ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाच्या जनजागृतीसाठी ७५ सायकलिस्टने रॅलीत सहभाग घेतला होता. सायकल रॅलीच्या पाठोपाठ जीपची थार रॅलीही निघाली. टॉर्क आरपीएम १५ आणि ग्रेप सिटी ऑफ रोड या ग्रुपने थार रॅलीत सहभाग घेतला होता.

लायन्स क्लब नाशिक मेट्रोचे पदाधिकारी, शिवताल ढोल- ताशा पथकाचे नारायण जाधव, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, थार रॅलीत सहभागी ग्रुपचे हर्षद कडभाने, तसेच सुभेदार हरीश वानिया, सुभेदार चैनसिंह राजपुरोहीत या सर्वांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे आणि अशोक अत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महापालिकेच्या मुख्य इमारतीला विद्युत रोषणाई आणि मुख्य दरवाजाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नववर्ष स्वागत समितीच्या सदस्यांनी काढलेल्या विविधरंगी आकर्षक रांगोळीने मनपा मुख्यालयाचे सौंदर्य आणखीन खुलले आहे.

ध्वजस्तंभ आणि परिसरही फुलांनी सजविला आहे. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या माहितीचे फलकही संपूर्ण शहरामध्ये लावण्यात आले आहेत. एलईडी स्क्रीनवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT