Anant Chaturdashi esakal
नाशिक

Anant Chaturdashi 2023 : विसर्जन मिरवणूक सकाळी अकरालाच; गणेश मंडळांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ganeshotsav News : विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिस आणि गणेश मंडळाची बैठक शनिवारी (ता. २३) पार पडली. बैठकीत विसर्जन मिरवणूक सकाळी अकरालाच काढण्यावर एकमत झाले. तसेच, ढोलपथक असलेल्या मंडळींना मर्यादित वादक असण्याच्या सूचना केल्या. सोमवारी (ता. २५) पुन्हा बैठक होणार आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्यात परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक नियोजनासंदर्भात गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची तयारी सुरू केली. (Anant Chaturdashi 2023 Immersion procession will be start at 11 am nashik news )

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद असल्याने पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेचा ताण वाढला आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूक मंडळांनी सकाळी अकरालाच ‘श्रीं’च्या आरतीसह श्रीफळ अर्पण करून सुरवात करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

वेळेचे पालन करण्याचे आश्वासन मंडळांनी दिले आहे. बैठकीला सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, नितीन जाधव, भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सरकारवाड्याचे दिलीप ठाकूर यांच्यासह गणेश महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, विनायक पांडे, प्रथमेश गिते यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

- मिरवणुकीसाठी क्रमांक सोमवारी देणार

- डीजेवर बंदी, त्याऐवजी ढोल-ताशे

- वाद्य रात्री बाराला बंद

- रात्री बारानंतर मंडळ रामतीर्थकडे

- मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई

- ढोलवादकांची संख्या मर्यादित

"ढोलपथकांतील सदस्याची संख्या मर्यादित ठेवावी, मिरवणूक रेंगाळणार नाही याची खास दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मध्यरात्री बाराला सर्व प्रकारची वाद्ये बंद करून मिरवणूक मार्गस्थ केली जाईल. पुन्हा येत्या सोमवारी बैठक घेण्यात येईल. त्यात मंडळांना क्रमांक दिले जातील. तसेच, विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील. ज्याचे पालन प्रत्येक मंडळास बंधनकारक असेल." - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात स्थिर वाढ; सेन्सेक्स-निफ्टी सपाट, कोणते शेअर्स वाढले?

Quick Commerce: आता किराणासारख्याच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूही १० मिनिटांत घरी पोहोचणार, टाटा आणि अंबानी नवा अध्याय सुरू करणार

Recharge Offers : दिवसाला फक्त 5 रुपयांत वर्षभराचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉल, रोज 2GB डेटा, SMS अन् बरंच काही..बड्या कंपनीने आणली ऑफर

Teacher Recruitment : डीएड-बीएडधारकांसाठी सुवर्णसंधी! राज्यात १८ हजार शिक्षकांची होणार भरती; 'या' तारखेला 'टीईटी' परीक्षा

Jayant Patil : जयंत पाटलांना घेरण्यासाठी महायुती एकवटली, इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत एकदिलाचा निर्धार

SCROLL FOR NEXT