accident app
accident app esakal
नाशिक

वाढत्या अपघातांना बसणार आळा! अँड्राइड मोबाईल ॲप विकसित

विनोद बेदरकर

नाशिक : रस्त्यावरील वाढत्या अपघातांना आळा घालून त्यावर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी पोलिस, महापालिका आणि बांधकाम विभागाने संयुक्तरीत्या इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी ॲप) विकसित केले आहे. यात नाशिक जिल्हा (nashik district) राज्यात प्रथम क्रमांकावर असून, जिल्ह्यातील ४० पोलिस ठाण्यांतील २३४ अपघातांची नोंद झाली आहे. शहर आयुक्तालयात पोलिसांना प्रशिक्षण सुरू असून, साधारण पुढील आठवड्यापासून माहिती भरण्यास सुरवात होऊ शकते. (Android-mobile-application-to-prevent-accidents-nashik-marathi-news)

राज्यात नाशिक पहिल्या स्थानी, २३४ अपघातांची माहिती अपलोड

इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा उपक्रम आहे. देशातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी संपूर्ण भारतात अचूक रस्ते अपघात डेटा संकलन यंत्रणा स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) ने मोबाईल आणि वेब ॲप्लिकेशन विकसित केले आहे. हे मोबाईल ॲप रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची नोंद करणे, त्या अपघाताविषयी योग्य ती कार्यवाही करणे व अपघात कसे कमी करता येतील, त्याची चिकित्सा करण्यासाठी वापरता येणार आहे. मोबाईल अँड्राइड ॲप्लिकेशनमुळे अपघातांच्या अद्ययावत नोंदीनुसार ते रोखण्यासाठी उपाय शोधता येणार आहे.

मोबाईल ॲप्लिकेशनबाबत पोलिसांना प्रशिक्षण

आयआरडीए मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये पोलिस विभागाशिवाय महापालिका बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग, प्रादेशिक परिवहन विभागाचा समावेश करण्यात आला आहे. पोलिस विभागाकडून रोज होणाऱ्या अपघातांच्या नोंदी माहिती मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अपलोड केली जाईल. ग्रामीण भागात जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, नीलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असून, ग्रामीण पोलिसांनी २३४ अपघातांची नोंद अपलोड केली आहे. जी राज्यात सर्वाधिक आहे. तर शहरात पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन झाले. उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, अमोल तांबे, संजय बारकुंड, सहाय्यक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड, सोहेश शेख, मधुकर वसावे, दीपाली खन्ना, ‘एनआयसी’च्या सूचना विज्ञान अधिकारी स्नेहा शुक्ला, ज्योती गांगुर्डे आदींच्या उपस्थितीत रोज चार सत्रांत मोबाईल ॲप्लिकेशनबाबत पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे.

माहिती अपलोड

संबंधित ॲप्लिकेशन अँड्राइड असून, प्रत्येक पोलिस अपघातानंतर घटनास्थळी भेट देणारे पोलिस अधिकारी, अंमलदार हे अपघाताचे छायाचित्र, व्हिडिओ शूटिंग, अपलोड करण्याची सोय त्यात आहे. त्यामुळे गुगल लोकेशन क्लिक केल्यामुळे अपघाताचे घटनास्थळ योग्य प्रकारे निश्चित करण्यास मदत होणार आहे. याविषयी ‘एनआयसी’कडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आयआरएडी ॲपद्वारे देशाच्या प्रत्येक भागातून अपघात डेटा एकत्र करणे. देशभरातील गोळा केलेल्या रस्ते अपघाताच्या आकडेवारीचे विश्लेषण करून, त्यानुसार भारतातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी रणनीती तयार केली जाईल. - राजेश साळवे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT