FIRE esakal
नाशिक

नाशिक : गोमांसने भरलेला पीकअप संतप्त नागरिकांनी पेटवला

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : गोवंशांच्या हत्येवर बंदी असताना त्याची छुप्या मार्गाने कत्तल होऊन मासांची वाहतूक करणाऱ्या एका पीकअपला संतप्त नागरिकांनी पेटवून दिले. शुक्रवारी रात्री एक पीकअप गोमांस घेऊन जात असल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी तो पेटवून दिला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला

शहरातील फत्तेबुरुज नाका भागात कोपरगावच्या दिशेला जात असलेला पीकअप (एमएच.६, ए.जी. ३४३१) या वाहनाचे मागील टायरचे अक्सेल तुटल्याने चालकाने गाडी थांबवली. भररस्त्यालगत गाडी थांबल्यावर काही नागरिकांना गाडीमध्ये गोमांस असल्याचा संशय आला. या भागात काही वेळातच नागरिकांची गर्दी झाल्याने पीकअप चालक घटनास्थळाहून पसार झाला. मात्र संतप्त झालेल्या नागरिकांनी गोमांसने भरलेला पीकअप पेटवून देत आपला संताप व्यक्त केला.

या घटनेची माहिती कळताच पोलिस तत्काळ अग्निशमन दलासह घटनास्थळी दाखल झाले व आग नियंत्रणात आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक अर्षद इकबाल शेख (रा.ओझरमिग) याने नाशिक येथील हनिफ कुरेशी यांच्याकडून हे गोवंशमांस घेऊन विक्री करण्यासाठी चालवले होते. याप्रकरणी पोलिस श्याम जाधव यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरोधात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे व सहकारी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMFBY: एल निनोचा इशारा! अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ; शेतकऱ्यांना लाखोंची नुकसानभरपाई देतो हा विमा

IPL 2027 Trade Update: महेंद्रसिंग धोनी CSK चा नवा प्रशिक्षक? स्टीफन फ्लेमिंगबाबत नवे अपडेट्स, हार्दिक पांड्या...

Oracle Layoffs : AI ने हिसकावली रोजी रोटी ! ओरॅकलने २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, भविष्यातही नोकऱ्यांवर येणार गंडांतर

Nagpur: चिखलातून वाहने चालविण्यासाठी व्हा सज्ज!; पावसाळा तोंडावर अन् रस्त्यांची चाळण; वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

Latur News: लातूर जिल्ह्यास मोठा दिलासा; अहमदपूर-उदगीर रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी, ३०० कोटी मंजूर, आ. संजय बनसोडेंच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT