Aggressive farmers' association demanding lifting of export ban on onions staged a protest on the Satana-Malegaon state highway in front of the market committee here.  esakal
नाशिक

Onion Export Ban: मोदीजी, निर्यातबंदी कधी उठविणार? सटाण्यात संतप्त शेतकऱ्यांचा रुद्रावतार अन महामार्गावर रास्तारोको

केंद्रातील भाजपप्रणीत मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : केंद्रातील भाजपप्रणीत मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यातबंदीनंतर सातत्याने कांदा दरातील घसरण सुरूच आहे. यामुळे उत्पादक शेतकरी संतापला असून याचा भडका आज गुरुवारी (ता.१) सटाणा येथे उडाला.

मोदीजी, कांद्यावरील निर्यातबंदी कधी उठविणार असा संतप्त प्रश्न करीत लवकरात लवकर उठवावी अशी मागणी आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनेतर्फे आज करण्यात आली.

सकाळी अकराला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील सटाणा - मालेगाव राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. (Angry farmers protest block highway at satana over Onion Export Ban nashik news)

संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी करत सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडले. संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी म्हणाले, कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादल्यामुळे सध्या कांद्याचे दर कोसळले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला आले. मते मिळविण्यासाठी प्रभू श्रीरामाला भेटले, मात्र शेतकऱ्यांच्या मनातील रामाचे दर्शन त्यांनी घेतले नाही.

नाशिकमध्ये कांदा प्रश्नी बोलून बळीराजाला दिलासा देणे गरजेचे असताना ते काहीही बोलले नाही. उलट त्यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी आवाज उठविणाऱ्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप मोदी सरकारने केले.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कांद्याची निर्यातबंदी लवकर न उठवल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही श्री. सूर्यवंशी यांनी दिला.

आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी, भास्कर सोनवणे, भास्कर बागूल, देविदास अहिरे, नयन सोनवणे, महेंद्र जाधव, भिका सूर्यवंशी, ज्ञानेश्वर जाधव, यशवंत गुंजाळ, वसंत जाधव, माणिक निकम, दौलत तोताराम, प्रवीण अहिरे, सुनील वाघ, सुनील बिरारी, देविदास जाधव, वैभव अहिरे, नीलकंठ भालेराव, शेखर बागूल, गोकूळ बागूल, समाधान वाघ, विवेक सोनवणे, नितीन सूर्यवंशी आदींसह शेकडो शेतकरी सहभागी होते.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आले असताना कांद्याच्या दराचा प्रश्न गंभीर होता, ते याप्रश्‍नावर काही बोलून शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी आशा होती, मात्र दिलासा दूरच, त्यांनी साधा कांदा हा शब्दही उच्चारला नाही याचे वैषम्य वाटते. कांदा उत्पादक देशोधडीला लागल्यानंतर निर्यातबंदी उठविणार आहात का?"

- केशव सूर्यवंशी, बागलाण तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT