UGC-NET.png 
नाशिक

'यूजीसी-नेट' परीक्षेच्‍या तारखेत आणखी एकदा बदल; 'या' तारखेला होणार परीक्षा

अरुण मलाणी

नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे यूजीसी-नेट (जून) परीक्षेच्‍या तारखेत आणखी एकदा बदल केला आहे. या बदलानुसार आता यूजीसी-नेट २०२० ही परीक्षा या तारखेला घेतली जाणार आहे. वाचा सविस्तर..

वेळापत्रक व अन्‍य सविस्‍तर तपशील संकेतस्थळावर

एनटीएतर्फे जाहीर केलेल्‍या परिपत्रकानुसार संस्‍थेतर्फे आयसीएआर एक्‍झामिनेशन एआयईईए-यूजी व पीजी आणि जेआरएफ, एसआरएफ (पीएचडी) २०२०-२१ या परीक्षा बुधवार (ता. १६), गुरुवार (ता. १७), तसेच २२ आणि २३ सप्‍टेंबरला होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर यूजीसी-नेट परीक्षेच्‍या तारखेत बदल केला आहे. या बदलानुसार आता यूजीसी-नेट २०२० ही परीक्षा २४ सप्‍टेंबरला घेतली जाणार आहे. विषयनिहाय वेळापत्रक व अन्‍य सविस्‍तर तपशील संकेतस्थळावर उपलब्‍ध करून दिल्याचेही पत्रकात म्हटले आहे. प्रवेशपत्रावर आसन क्रमांक, परीक्षा केंद्र तारीख, सत्र आणि वेळ आदींबाबतची माहिती नमूद केली आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. दरम्‍यान, जूनमध्ये ही परीक्षा होणार होती; परंतु कोरोनामुळे उद्‌भवलेल्‍या परिस्‍थितीत ती स्‍थगित करण्यात आलेली होती. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Mob kills young Hindu: संतापजनक! बांगलादेशात जमावाने आणखी एका हिंदू तरुणाचा बेदम मारहाण करून घेतला जीव

Christmas: चक्कर येऊन पडला सांताक्लॉज..., 'आप'च्या तीन बड्या नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल; चेष्टा करणं पडलं महागात

Crime: गुन्ह्यांचं शतक करायचं होतं, पण ५०० रुपयांच्या नोटेनं खेळ बिघडवला, तरुणाला तुरुंगवास घडवला, काय घडलं?

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Latest Marathi News Live Update : एमजीएमच्या मैदानावर रंगणार नऊ दिवस सामने

SCROLL FOR NEXT