Property Fraud esakal
नाशिक

Nashik Land Fraud: मालेगावच्या भूमाफियांचा आणखी एक कारनामा उघड; जमीन व्यवहारात 1 कोटी 5 लाखाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Land Fraud : शहरातील जमीन खरेदी-विक्री व्यवसायातील दलाल भूमाफियांनी मालमत्ता असलेले सावज हेरून त्याला जबरदस्तीने मोठ्या रक्कमेने विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या वासुदेव शिर्के व त्यांच्या सहकारी टोळीचा फसवणुकीचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे.

१६ नोव्हेंबर २०२१ ला घडलेल्या या प्रकारात लोकेश शंकर निकुंभ (वय ४७, रा. काठे गल्ली, नाशिक) यांची एक कोटी ५ लाखाला फसवणूक करण्यात आली. (Another exploit of Malegaon land mafia exposed 1 crore 5 lakh fraud in land transaction nashik news)

लोकेश निकुंभ यांचा द्याने शिवारातील भूखंड जमीन दलाल वासुदेव शिर्के व त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी एक कोटी २५ लाख रुपयांना व्यवहार ठरविला. हा भूखंड सतीश क्षत्रिय याच्या नावाने घ्यावयाचा आहे असे सांगून १६ नोव्हेंबर खरेदी खत निश्‍चित केले.

प्रत्यक्षात सतीश क्षत्रिय, दिनेश रुंगठा, राकेश रुंगठा यांच्या नावाने तीन वेगवेगळे खरेदीखत करून घेतले. त्यापोटी श्री. निकुंभ यांना १४ लाख ८४ हजाराचे धनादेश दिले. हे धनादेश वटले. वासुदेव शिर्केने उर्वरित एक कोटी ५ लाखाचा धनादेश स्वत:च्या स्वाक्षरीचा दिला.

खरेदीखत होताच त्यांनी श्री. निकुंभ यांचे अपहरण करून त्यांना एका हॉटेलमधील खोलीत डांबून ठेवून मारहाण केली. दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने नाशिकला नेत वरील धनादेश बँकेत भरण्यास सांगितला. मात्र तो परत आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याउलट जमीन दलालीपोटी शिर्के याने ११ लाख रुपयांचा धनादेश त्याच्या नावाने पास करून घेतला. प्रत्यक्षात या व्यवहारातील एक कोटी १० लाख १६ हजार रुपये श्री. निकुंभ यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही.

संशयितांनी त्यांना अपहरण करत मारहाण केली. तसेच कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कट कारस्थान व विश्‍वासघात करून फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. निकुंभ यांनी यापूर्वी शिर्के व टोळीचे कारनामे उघडकीस आल्यानंतर तक्रार अर्ज केला होता. या अर्जाच्या चौकशीवरून खात्री झाल्यानंतर छावणी पोलिसांनी या प्रकरणी श्री. निकुंभ यांच्या तक्रारीवरून वासुदेव शिर्के, मोहन सोनवणे, इब्राहीम रज्जाक, अशोक देवरे, सतीश क्षत्रिय, दिनेश रुंगठा व राकेश रुंगठा यांच्याविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT