sharad gite aaropi 1.png 
नाशिक

असा कसा उलट्या काळजाचा मुलगा..! आई-वडील मृत पावल्यानंतरही "त्याचा' कारनामा सुरूच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : आई-वडील मृत झाले असताना देखील निवृत्तिवेतनाचा नऊ वर्षांपासून लाभ घेत असल्याची बाब गुरुवारी (ता. 20) समोर आली. नाशिक-पुणे रोडवरील सेंट झेवियर्स शाळेशेजारी ग्रीन शाडो अपार्टमेंट येथील दोन फ्लॅट मालक जिवंत असताना खोटी कागदपत्रे बनवून अनधिकृतपणे फ्लॅटचा ताबा घेतल्याचा गुन्हा शरद जगन्नाथ गिते यांच्याविरुद्ध दाखल आहे. याच गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू असताना वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे समोर येत आहेत.

असे आहेत त्याचे कारनामे...

राज्य परिवहन महामंडळात नोकरीला असणारा शरद जगन्नाथ गिते याने नाशिक-पुणे रोडवरील नेहरूनगरसमोरील ग्रीन शाडो इमारतीमध्ये दोन फ्लॅट मालक जिवंत असताना खरेदी-विक्री कार्यालयात मालकाच्या जागी सासऱ्याला उभे करून छायाचित्र काढून खोटी खरेदी केली होती. यात शरद गितेसह त्याची पत्नी मनीषा शरद गिते व भावजय बबाई माधव गिते यांना अटक करण्यात आली आहे. शरद गिते याचे सासरे सुनील नागरे फरारी आहेत. चौकशीचा भाग म्हणून उपनगर पोलिसांनी गितेच्या जेल रोड येथील मंजुळा मंगल कार्यालयासमोर घराची झडती घेतली असता या घरात नाशिकमधील नामांकित डॉक्‍टरांचे शिक्के व विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयातील शिक्के, शासकीय दस्तऐवज, वस्तू मिळून आल्या. यात सखोल चौकशी केली असता 2008 पासून वडील मृत झाले होते. त्याचे निवृत्तिवेतन आईच्या नावे केले. यात आई मृत असतानाही पत्नीला आई असे दाखवून पत्नीच्या नावावर गेल्या नऊ वर्षांपासून गिते महामंडळाकडून अडीच हजार रुपये निवृत्तिवेतन उकळत असल्याची बाबही समोर आली आहे. 

अट्टल शरद गितेचा आणखी एक करारनामा; उपनगर पोलिसांकडून उघडकीस ​

खोटी कागदपत्रे तयार करून शासकीय विभागांना व विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांना गंडा घालणाऱ्या शरद गिते याची सखोल चौकशी होत असून, अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची आणखी शक्‍यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गितेविरुद्ध तक्रारी देण्यासाठी नागरिकही आता पुढे येत असल्याचे उपनगर पोलिस ठाण्यातील तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

विमा कंपन्यांनाही गंडा 
ग्रीन शाडो इमारतीच्या मागच्या बाजूस सहा महिन्यांपूर्वी जमिनीत पुरून ठेवलेला महामंडळाचा भरलेला तिकिटांचा ट्रे पोलिसांना मिळून आला होता. यातही गिते मुख्य सूत्रधार होता. तसेच वाहन हरविल्याचा खोटा दावा विमा कंपन्यांमध्ये दाखल करून पैसे उकळणे, चारचाकी गाड्या चोरणे, ग्रीन शाडो इमारतीमधील 23 लोकांच्या खोट्या सह्या करून रिलायन्स कंपनीचा टॉवर बसविण्याचा प्रयत्न आदी बाबी गितेने सफाईदारपणे केल्याचे तपासात उघड झाले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT