Apla Davakhana malegaon
Apla Davakhana malegaon esakal
नाशिक

पै-पैचा हिशेब ठेवणारा ‘आपला दवाखाना’ राज्यासाठी आदर्श

प्रमोद सावंत


मालेगाव (जि. नाशिक) : शहराला सामाजिक व राजकीय चळवळीचा मोठा इतिहास आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून समाजातल्या शेवटच्या घटकासाठी काम करणारे शेकडो हात शहरात कार्यरत आहेत. याच पद्धतीचे ध्येयवादी कार्यकर्ते, सेवाव्रती डॉक्टर, रुग्णांचे सहकार्य, दानशूरांच्या थेंब-थेंब मदतीच्या जोरावर लोकांचा लोकांनी लोकांसाठी चालविलेला ‘आपला दवाखाना’ पाच लाखांहून अधिक गरजू रुग्णांसाठी आधार ठरला आहे. निरपेक्ष वृत्तीने कासव गतीने गेली दीड दशके दवाखान्याचे कामकाज सुरू आहे. पै-पैचा हिशेब ठेवणाऱ्या या दवाखान्याचे कामकाज राज्यासाठी आदर्श उदाहरण आहे.

गरजू रुग्णांचा आधार ‘आपला दवाखाना’

राज्याचे दैवत असलेल्या विठुरायाचरणी आषाढीला ७ जुलै २००६ ला ‘आपला दवाखाना’ ध्येयवादी कार्यकर्ते, सेवाव्रती डॉक्टरांच्या सहकार्याने सुरू झाला. कॅम्पातील मेन रोडवरील शांतीनिकेतन चौकातील शाखेत सुरू झालेल्या या दवाखान्याचा हळूहळू विस्तार होतोय. दवाखान्याचे कामकाज पाहून दानशूर दवाखान्याला फूल अन् फुलाची पाकळी म्हणून मदत करू लागले. २०१० पासून दवाखान्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवण्यास सुरवात केली. २०२० अखेर चार लाख ९४ हजार ३६३, तर ऑगस्ट २०२१ अखेर प्रारंभीचे चार वर्षे नोंद नसलेल्या रुग्णांसह सुमारे सव्वापाच लाखांहून अधिक रुग्णांनी आपल्या दवाखान्याच्या चार शाखांमधून नि:शुल्क उपचार व गोळ्या-औषधी घेतल्या.

खिशात कवडी-दमडी नसलेल्या, हातावरचे पोट असलेल्या कष्टकरी, कामगार, होतकरूंबरोबरच सामान्यांसाठीही आपला दवाखाना वरदान ठरू लागला आहे. मे २०२१ मध्ये एक हजार १८०, तर जुलैमध्ये दोन हजार ७१५ रुग्णांनी उपचार घेतले. २००६ मध्ये शुभारंभालाच शहरात चिकूनगुनियाच्या साथीचा उद्रेक झाला. आपला दवाखाना गरजूंना खरा आधार ठरला. उपचारासाठी रुग्णांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. मोफत वैद्यकीय उपचार व सेवा दिली जाते. ‘आपला दवाखाना’च्या चारही शाखांमध्ये दानपेटी आहे. उपचारासाठी आलेले रुग्ण, नातेवाईक त्यात यथाशक्ती दान करतात.

रुग्णांवर उपचार भुकेल्यांना अन्न या उपक्रमाचे फलीत

वैद्यकीय उपचारांबरोबरच समाजातील निराधार, अंध, अपंग, वृद्ध अशा गरजू लोकांसाठी भोजनाची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी आपला दवाखाना परिवारामार्फतच ‘आनंदप्रसाद’ हा उपक्रम २८ मार्च २०१३ पासून सुरू करण्यात आला. रोज सरासरी दीडशे ते पावणेदोनशे गरजूंना सन्मानपूर्वक आनंदप्रसाद भोजन दिले जाते. दरमहा सुमारे चार ते साडेचार हजार लोक या उपक्रमाचा लाभ घेतात. समाजातील दानशूर व संवेदनशील दात्यांचा भरभक्कम पाठिंबा, ध्येयाने झपाटलेले कार्यकर्ते, सेवेतील अग्रणी डॉक्टरांच्या सहकार्याने आपला दवाखाना पंधरा वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. तर आनंदप्रसाद हा उपक्रम आठ वर्षांपासून सुरू आहे. सुमारे सव्वापाच लाख रुग्णांवर उपचार व चार लाख भुकेल्यांना अन्न हे या उपक्रमाचे फलीत आहे. या उपक्रमातील कार्यरत कार्यकर्ते कधीही स्वत:चे नाव न सांगता बिनभोबाटपणे काम व दानशूरांकडून मदत जमा करतात.

आपला दवाखान्याला या सेवेसाठी दरमहा सुमारे पावणेतीन ते तीन लाख रुपये खर्च येतो. रुग्ण व दात्यांनी केलेले दान वगळता खर्चासाठी दरमहा सुमारे आठ ते पंधरा हजार रुपयाहून अधिक तूट येते. विशेष म्हणजे दात्यांना दरमहा जमा-खर्चाचा हिशेब व छोटेखानी दोनपानी सुविचार-पुस्तिका दिली जाते. अशा उपक्रमांना दात्यांनी भरभरून मदत केल्यास एक मोठी चळवळ व मोठे रुग्णालय उभे राहिल्यास नवल वाटावयास नको. आपला दवाखान्यास दानशूरांना मदत करावयाची असल्यास ९४२३६९१३८० या क्रमांकावर संपर्क साधावा.

icu

आपला दवाखाना शाखा...

शांतीनिकेतन चौक, मेन रोड कॅम्प
दंतोपचार विभाग, शांतीनिकेतन चौक कॅम्प
श्रीरामनगर - टिळकनगर, जिमखान्यासमोर
होमिओपॅथिक उपचार केंद्र, शहा इलेक्ट्रिकलखाली, स्टेट बँक चौक

सेवाव्रती डॉक्टर

डॉ. मयूरा शहा, डॉ. सविता महाले-शेलार, डॉ. रमेश पटेल, डॉ. प्रीतेश लोढा, डॉ. श्रद्धा काबरा, डॉ. विशाल चांदगीर, डॉ. योगेश चंचलवाड, डॉ. सिद्धांत जोशी, डॉ. भक्ती रोहीडा, डॉ. हेमका जैन, डॉ. रिया चोरडिया, डॉ. विश्‍वास ब्राह्मणे, डॉ. राजश्री नहार, डॉ. रिद्धी जैन, डॉ. सचिन सुराणा, डॉ. राजेश शहा, डॉ. राजेंद्र शिरुडे, डॉ. नितल नहार.

दरमहा सादर होणारा जमा- खर्च : जुलै २०२१
सेवक मानधन- ११ हजार २९५
डॉक्टर मानधन- ९२ हजार ६००
वीजबील, पोस्ट खर्च- २१ हजार ५८८
दवाखाना भाडे- चार हजार
वैद्यकीय उपचार खर्च- ७१ हजार ९६७
रुग्ण सहाय्य- ३९ हजार ६५०
डेंटल चेअर दुरुस्ती अनामत- १९ हजार २००
ग्राइंडर खरेदी- पाच हजार
एकूण खर्च- दोन लाख ७५ हजार ३००

आपला दवाखान्यास जमा निधी :

रुग्णांनी केलेले दान- एक लाख ४४ हजार ४८५
दात्यांनी केलेले दान- एक लाख २४ हजार ३२०
तूट- सहा हजार ४९५
एकूण- दोन लाख ७५ हजार ३००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Jonty Rhodes : गंभीर 2019 पासूनची परंपरा मोडणार; जॉन्टी रोड्स होणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT