GPAT Exam
GPAT Exam esakal
नाशिक

GPAT Exam : ‘जिपॅट’ च्‍या अर्जाची 6 मार्चपर्यंत मुदत; NTAतर्फे वेळापत्रक जारी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी यांच्‍यातर्फे ग्रॅज्‍युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्‍ट (जिपॅट) २०२३ या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. त्‍यानुसार पात्र विद्यार्थ्यांना ६ मार्चपर्यंत ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. (Application deadline for GPAT Exam till March 6 Schedule released by NTA nashik news)

औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या एम. फार्म.च्‍या प्रवेशासाठी जिपॅट ही राष्ट्रीय स्‍तरावरील प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना जिपॅट परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी ६ मार्चपर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे. याच मुदतीत ऑनलाइन माध्यमातून परीक्षा शुल्‍क भरावे लागेल.

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी यांच्‍यातर्फे अद्यापपर्यंत परीक्षेच्‍या तारखांची घोषणा केलेली नाही. आगामी काळात परीक्षांचे वेळापत्रक, प्रवेशपत्राची उपलब्‍धता व अन्‍य तपशील जारी केला जाणार असल्‍याचे एनटीए यांच्‍या माध्यमातून स्‍पष्ट करण्यात आलेले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

चुकांची पुर्नरावृत्ती टाळावी

गेल्‍यावर्षी २०२२ मध्ये झालेल्‍या जिपॅट परीक्षेत पुरता गोंधळ झाला होता. अनेक परीक्षा केंद्रांवर नियमांचे उल्‍लंघन झाल्‍याचे आढळून आले होते. तसेच तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले होते.

या परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांनी थेट न्‍यायालयात धाव घेतांना दाद मागितली होती. या परीक्षा कालावधीत झालेल्‍या चुकांची पुर्नरावृत्ती यावर्षी टाळली जावी, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्राकडून व्‍यक्‍त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Latest Marathi News Update : दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

SCROLL FOR NEXT